"जब्बार पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
| पती_नाव =
| पत्नी_नाव = मणी
| अपत्ये = जस्मीनमुली - जस्मिन, जोनाकी
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
ओळ ३१:
 
==बालपण==
जब्बार पटेल याणायांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्य दिग्दर्शनाचीहीनाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पदले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसविलेले ’चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली
 
पुण्याच्या [[बी.जे. मेडिकल कॉलेज|बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून]] वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात [[विजय तेंडुलकर]] आले. त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. उदा० [[विजय तेंडुलकर|तेंडुलकरांची]] ’बळी’ ही एकांकिका किंवा ’श्रीमंत’ हे नाटक. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बर्‍याच [[नाट्यस्पर्धा|नाट्य स्पर्धांमध्ये]] बक्षिसे मिळवली. [[विजय तेंडुलकर|तेंडुलकरांनी]] जब्बार पटेलांना त्यांचे ’अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर त्यांना ’घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाले.. हे नाटक खूप गाजले.
ओळ ३८:
 
==[[चित्रपट]] क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात==
एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला [[चित्रकला|चित्रकलेचे शिक्षक]] आणि वात्रटिकाकार [[कवी]] [[रामदास फुटाणे]] आले. त्यांनी समोर ’सामना’ चित्रपटाची [[पटकथा]] ठेवली, आणि म्हणाले,”आपण यावर चित्रपट काढायचा आहे!" तेंडुलकरांची संमती होतीच. आणि जब्बार पटेल हे ’सामना’ या त्यांच्या पहिल्या [[चित्रपट|चित्रपटाचे]] [[दिग्दर्शक]] झाले. (इ.स. १९७४)
 
==कारकीर्द==
ओळ ६६:
* इंडियन थिएटर
* कुसुमाग्रज
* मी एस. एम.
* लक्ष्मणराव जोशी
 
==वैयक्तिक जीवन==
डॉ. जब्बार पटेल यांची पत्‍नी डॉक्टर आहे. त्यांना दोन मुली आहेत.
 
 
==पुरस्कार==
* २०१४ सालचे अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे दिले गेलेले (४९वे) [[विष्णुदास भावे]] गौरव पदक.
* पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार.
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
 
==बाह्य दुवे==