"जब्बार पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ३१:
==बालपण==
जब्बार पटेल याणा वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्य दिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पदले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसविलेले ’चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली
पुण्याच्या [[बी.जे. मेडिकल कॉलेज|बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून]] वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात [[विजय तेंडुलकर]] आले. त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. उदा० [[विजय तेंडुलकर|तेंडुलकरांची]] ’बळी’ ही एकांकिका किंवा ’श्रीमंत’ हे नाटक. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बर्याच [[नाट्यस्पर्धा|नाट्य स्पर्धांमध्ये]] बक्षिसे मिळवली. [[विजय तेंडुलकर|तेंडुलकरांनी]] जब्बार पटेलांना त्यांचे ’अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर त्यांना ’घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाले.. हे नाटक खूप गाजले.
जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहाध्यायींमध्ये [[अनिल अवचट]], [[कुमार सप्तर्षी]] यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने प्रॅक्टिससाठी [[पुणे|पुण्याजवळचे]] [[दौंड]] हे गाव निवडले. जबार पटेल हे बालरोगतज्ज्ञ आणि त्यांची पत्नी स्त्री-रोगतज्ज्ञ. वडील [[रेल्वे]]त होते, म्हणून निदान [[रेल्वे]]तील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती. हळूहळू प्रक्टिसमध्ये जम बसू लागला. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ’घाशीराम’च्या तालमींसाठी [[पुणे|पुण्यात]] यायचे. असे साडेतीन महिने चालू होते.
==[[चित्रपट]] क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात==.
एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला [[चित्रकला|चित्रकलेचे शिक्षक]] आणि वात्रटिकाकार [[कवी]] [[रामदास फुटाणे]] आले. त्यांनी समोर ’सामना’ चित्रपटाची [[पटकथा]] ठेवली, आणि म्हणाले,”आपण यावर चित्रपट काढायचा आहे!" तेंडुलकरांची संमती होतीच. आणि जब्बार पटेल हे ’सामना’ या त्यांच्या पहिल्या [[चित्रपट|चित्रपटाचे]] [[दिग्दर्शक]] झाले.
==कारकीर्द==
|