"पाटेश्वर लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असल...
खूणपताका: वार्तांकनशैली ?
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ ७:
पाटेश्वरची हिंदू (ब्राम्हणी) लेणी कधी आणि कोणी खोदली हे अज्ञात असले तरी पाटेश्वरचे मंदिर अठराव्या शतकात सरदार अनगळ यांनी बांधल्याचे ज्ञात आहे.
 
==पाटेश्वर गडावर पाहण्याचीपाहण्यासारख्या ठिकाणेगोष्टी==
१. पाटेश्वरचा डोंगर चढतांना रस्त्यात दगडात कोरलेली गणपतीची प्राचीन मूर्ती दिसते.. डोंगरावर सुरुवातीला कमळांनी भरलेली "विश्वेश्वर पुष्करणी" आहे. या पुष्करणीच्या एका भिंतीवर शंकराची दुर्मीळ अशी "एकपाद" मूर्ती कोरलेली आहे, या शिल्पातील मूर्तीला एकच पाय कोरलेला आहे.
 
२. पुष्करणी जवळूनच पहिल्या लेण्याकडे जाण्याचा मार्ग आहे, या लेण्याला मरगळ म्हशीचे लेणे म्हणतात.या लेण्यात मृतावस्थेत पडलेल्या म्हशीच्या पाठीवर शिवलिंग दाखवलेले आहे. याचा संदर्भ महिषासूर मर्दनाच्या पुराणातील कथेशी असावा. या बरोबरच लेण्यात एकूण ६ शिवलिंग ओळीने कोरलेली आहेत. यातील एक शिवलिंग कोरलेल्या दंडगोलाकार उंचवट्यासारखे आहे. याच गुहेतील एका शिल्पपटात पाच शिवलिंगे कोरलेली आहेत. ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात, अशी समजूत आहे.
 
३. पुष्करणी जवळूनच पायर्‍यांचा मार्ग पाटेश्वर मंदिराकडे जातो. या मार्गावर २ शिवलिंगे आहेत. यातील एका पिंडीवर मध्यभागी मुख्य शिवलिंग व बाजूने ६८ शिवलिंगे कोरलेली आहेत. तर दुसर्‍या शिवलिंगावर मध्यभागी मुख्य शिवलिंगावर दाढी, मिशा असलेला शंकर कोरलेला आहे आणि बाजूने ७१ दंडगोलाकार शिवलिंगे कोरलेली आहेत.