"पेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
==इतिहास==
या किल्ल्याचे नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.
 
==जाण्याच्या वाटा==
मध्य रेल्वेने कर्जतजवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला व उजवीकडची वाट पेबला जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान, पोल्ट्रीफार्म, अर्धवट घरांची अर्धवट बांधकामे दिसतात. त्यानंतर समोर दिसणार्‍या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने गेल्यावर सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर येतो. तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळच तीन वाटा आहेत.
 
१) धबधब्याला लागून असलेली वाट.
२) मधून गेलेली मुख्य वाट.
३) टॉवर्सला लागून असलेली वाट
 
==गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे==
पेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहे समोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता येते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पेब" पासून हुडकले