"मंगळगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २०:
==कसे जाल ?==
मंगळगडाला जाण्यासाठी
भोर-महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदर्या, ओढे नाले ओलांडीत सहासात तासांच्या जंगलातील पायपिटी नंतर मंगळगड गाठता येतो. महाडकडून भोरकडे जाताना भिरवाडीच्या पायथ्याच्या पिंपळवाडीकडे जाणारा फाटा आहे. या गाडीरस्त्यानेही पिंपळवाडीला तासाभरात पोहोचता येते. शकतो. महाडहूनही ठरावीक वेळेत पिंपळवाडीसाठी एस.टी. बसेस आहेत.
पिंपळवाडीतून गडावर जाणारी वाट म्हणजे उभा चढ आहे. चांगल्या चालीने दीड तासात आपण गडावर पोहोचतो. एका उद्ध्वस्त झालेल्या दरवाजाच्या अवशेषामधून गडात प्रवेश होतो. गडाचा विस्तार बर्यापैकी मोठा आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर एका वाड्याचे अवशेष आहेत. उत्तर अंगाला पाण्याची कातळ-कोरीव टाकी आहेत. गडाला एक माची आहे. माची तटबंदीने बांधून काढलेली आहे. कातळमाथ्याच्या खाली दोन लहान सुळके आहेत. त्यांना स्थानिक लोक नवरानवरीचे सुळके म्हणतात.
चौथा रस्ता हा पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजे २४ किलोमीटर अंतर असलेल्या सडे या गावातून आहे. सडे गावाच्या पुढे वडघर गावातूनसुद्धा मंगळगडावर जाण्यास दोन रस्ते आहेत. पोलादपुरातीलाच ढवळे या गावातून कांगोरीगडावर जाण्यासाठी ६ तास लागतात
असे असले तरी, प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी शेवटी एकच वाट आहे आणि ती ओळखणे सोपे आहे. मान उंच करून पहिले तर माणसाच्या आकाराचे नवरा-नवरीचे दोन सुळके दिसतात. गडावर जाण्याची एकमेव वाट ह्या सुळक्यांच्या खालूनच जाते. हे सुळके नजरेच्या टप्प्यात ठेवले तर साहसवीरांसाठी कुठूनही गडावर चढाई करता येईल.
==इतिहास==
|