"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
== जीवन ==
नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ|बनारस हिंदू विद्यापीठाच्या]] [[गणित]] विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. [[इ.स. १९५७]] साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते [[ब्रिटन|ब्रिटनमधील]] [[केंब्रिज]] येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, [[रँग्लर]] ही पदवी, खगोलशास्त्राचे [[टायसन मेडल]] व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
 
[[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
 
डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
 
== संशोधन ==