"कृष्णा कल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कृष्णा कल्ले या एक मराठी सुगम संगीत गायिका आहेत. त्यांनी १९६० तसेच १९७०च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी व शंभरहून मराठी गाणी गायली आहेत. 'केला इशारा जाता जाता' आणि 'एक गाव बारा भानगडी' या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील लावण्या त्यांनीच गायलेल्या आहेत. मुंबई आकाशवाणीच्या त्या 'अ' श्रेणीच्या गायिका होत्या.
 
मूळच्या कारवारी, पण वडिलांच्या उत्तरप्रदेशातील कानपूर येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान [[पंडित नेहरू]] आणि राष्ट्रपती [[राजेंद्रप्रसाद]] यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा‍र्‍या यात्राजत्रांतीलयात्रां-जत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला.
 
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी==
ओळ २३:
* [[अरुण दाते]] यांच्या आग्रहाखातर कृष्णा कल्ले यांनी १९६५मध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या गायन स्पर्धेत भाग घेतला आणि 'गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया'चा किताब मिळवला.
* ठाणे महापालिकेने प्रतिष्ठेच्या [[पी.सावळाराम]] पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
[[वर्ग:मराठी गायक]]