"सुमनताई बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: सुमनताई बेहेरे (जन्म :मुंबई, १२ मार्च १९२६; मृत्यू : मुंबई, ऑक्टोबर... |
No edit summary |
||
ओळ १:
सुमनताई बेहेरे (जन्म :मुंबई, १२ मार्च १९२६; मृत्यू :
सुमनताई बेहेरे यांच्या प्रकाशन संस्थेने 'मेनका' (१९६०), 'माहेर' (१९६२) ही कौटुंबिक आणि 'जत्रा' (१९६३) हे विनोदी नियतकालिक सुरू केले. या तिन्ही नियतकालिकांना अल्पकाळातच वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. 'मेनका प्रकाशन'च्या जाहिरात विभागाची धुरा सुमनताईंनी समर्थपणे सांभाळली. मुंबई-पुणे असा प्रवास करीत, अत्यंत कष्टाने व दांडग्या लोकसंचयाच्या जोरावर त्यांनी प्रकाशनाची आर्थिक बाजू भक्कम केली. 'मेनका' आणि 'माहेर' मासिकांच्या विशेषांकांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली.
आचार्य अत्रे यांनी 'मेनका'
शेवटच्या दहा वर्षांमध्ये सुमनताईंनी माहेर आणि मेनका या मासिकांत सतत बदल केले. १९६०-७०च्या दशकातील वाचक आणि आताचा वाचक यांच्यातील फरक आणि महिलांचे निराळे प्रश्न विचारात घेऊन या नवीनतेला स्पर्श करणारं लेखन प्रसिद्ध करणे त्यांनी सुरूच ठेवले होते. केलं. समाजोपयोगी काम करणार्या व्यक्ती आणि संस्था यांची माहिती सुमनताई आवर्जून प्रसिद्ध करू लागल्या. आरोग्य आणि आहार याबाबत त्यांच्या नियतकालिकांत लेखन येतच होते. पण त्याच्या जोडीला अर्थकारण, पर्यावरण अशा विषयांनाही त्या स्थान देऊ लागल्या. वाचकांचा सहभाग वाढण्यासाठी त्यांनी एक प्रश्न वाचकांसमोर मांडून त्यांच्याकडून उत्तरं मागविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
२०१० साली 'निवडक मेनका'चा पहिला खंड प्रसिद्ध झाला. आजचे विषय मांडणार्या नवीन लेखकांची पुस्तकंही या मेनका प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असतात.
|