"निंबा कृष्ण ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
==शैक्षणिक शुद्धी==
एन.के. ठाकरे जेव्हा विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची कॉपी करून पास होण्याची प्रवृत्ती होती. हा कलंक पुसण्यासाठी ठाकर्‍यांनी सत्त्ववशील शिक्षकांची एक फळी तयार केली. या ब्रिगेडने अचानक धाड घालून कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांना पकडून संस्थाचालकांना त्यांच्यावर कारवाई करायला भाग पाडले. शिवाय अनेक अंतर्गत गैरव्यवहारही शोधून काढले, आणि त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांचा कार्यक्रम राबवला. ठाकरे यांची शैक्षणिक शुद्धीची ही पहिली चळवळ कमालीची यशस्वी ठरली.
 
==शिक्षणाचा उंचावलेला स्तर==
विद्यापीठाचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रगत व्हावा म्हणून एन.के. ठाकरे यांनी तज्ज्ञ प्रोफेसरांना कामाला लावून आर्ट्‌स, सायन्स व कॉमर्स या तिन्ही शाखांसाठी १४८ नवी पाठ्यपुस्तके तयार केली. अभ्यासक्रमात कार्यानुभव व प्रकल्पपद्धती आणली. त्यामुळे शिक्षण समाजाभिमुख झालं. तसेच बायोकेमेस्ट्री, पॉलिमर केमेस्ट्री, फूड टेक्नॉलॉजी असे २५ नवीन अभ्यासक्रमही सुरू केले. या सर्व प्रयत्‍नांचे फलित म्हणजे ('इंडिया टुडे' २०१३ ने केलेल्या परीक्षणानुसार) या विद्यापीठाला महाराष्ट्रात पहिले स्थान मिळालेे आहे.
 
==पुरस्कार==