"रमण प्रल्हाद रणदिवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४:
मराठी, हिंदी व उर्दू गझलांचे गाढे अभ्यासक, गझलतंत्राचे भाष्यकार व ज्येष्ठ गझलकार डॉ.[[राम पंडित]] यांनी तर ‘[[सुरेश भट|सुरेश भटांनंतरच्या]] गझल सृजन साहित्यातील महत्त्वाचा गझलकार’ म्हणून रमण रणदिवेंचा उल्लेख केलेला आहे. गझलसम्राट [[सुरेश भट]] यांनी ‘शब्दांची इज्जत कशी करावी,’ हे शिकविले. ‘देखण्या आणि उपर्या शब्दांच्या नादी लागू नये. आधी आयुष्याला भिडा मग गझल आपोआप येईल,’ हे [[सुरेश भट|सुरेश भटांचे]] बोल रमणने कायम काळासाठी स्मरणात ठेवले आहेत. मराठी गझलांचे आणखी एक मर्मज्ञ गझलकार [[सुरेशचंद्र नाडकर्णी]] यांचे वास्तव्य पुण्यातच असल्या कारणाने रमण रणदिवेंना त्यांचा सहवास तर लाभला होताच; परंतु त्यांचे मौलिक मार्गदर्शनही मिळाले होते. सुप्रसिद्ध गीतकार [[शांता शेळके]] यांनी रमणला शब्दांच्या पुनरुक्तीतील प्रासादिकता आणि अर्थसघनता यांचे आकलन करून दिले. कवि [[शंकर वैद्य]] यांच्याकडूनही रमणने वेळोवेळी मार्गदर्शन घेतलेले आहे.
उत्तम आवाज, संगीताचे ज्ञान आणि संवादिनीवरून फिरणारा संगीतमय हात ही रणदिवेंची आणखी एक ओळख. त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा वारसा पुढे चालवला आहे. थोरला मुलगा उत्तम तबलावादक आहे तर दुसरा मुलगा संवादिनी आणि व्हायलिन वादक आहे. त्यांचे घर म्हणजे संगीतघरच आहे. अनेक चित्रपटांसाठी रमण रणदिवे यांनी गीतलेखन केले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत.
==रमण रणदिवे यांचे काव्यसंग्रह==
|