"श्रीपाद नारायण पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संपादनासाठी शोध संहीता वापरली |
No edit summary |
||
ओळ ४२:
पेंडसेंची पहिली कादंबरी ‘एल्गार’ १९४९ मध्ये प्रकाशित झाली.
‘एल्गार’ने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या.
‘एल्गार’ (१९४९) पाठोपाठ ‘हद्दपार’ (१९५०) आणि ‘गारंबीचा बापू’ (१९५२) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘गारंबीचा बापू’ ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी, चेटूक करणारी कादंबरी ठरली. याच तीन कादंबऱ्या समोर ठेवून गंगाधर गाडगीळांनी
सातत्य आणि प्रयोगशीलता हे कादंबरीकार म्हणून पेंडसे यांच्या प्रकृतीचे एक वैशिष्टय सांगता येईल.
मधल्या काळात ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९) या तीन कादंबऱ्या आणि ‘यशोदा’ व ‘राजेमास्तर’ ही दोन नाटके त्यांनी लिहिली. १९६२ मध्ये त्यांची ‘रथचक्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांच्या यशात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला. ‘रथचक्र’ला १९६३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
ओळ ५१:
कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या हयातीत अकरा नाटके लिहिली. त्यातील ‘राजेमास्तर’, ‘यशोदा’, [[‘गारंबीचा बापू’]], ‘असं झालं आणि उजाडलं’ आणि [[‘रथचक्र’]] ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय ‘महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’,‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दार’ ही वेगळ्या पिढीतली नाटके.
त्यांची नाटके आणि कादंबऱ्या या दोन्हीही सारख्याच लोकप्रिय आहेत.त्यांच्या नाटकात कोणती ना कोणती समस्या असते. प्रेक्षकांच्या विचारशक्तीला चालना देणारे विचार त्यांच्या नाटकात असतात. संवाद मोठे प्रभावी व सहज सुंदर असतात. एखाद्या समस्येच्या मुळाशी खोल खोल जाणे हा त्यांच्या प्रतिभेचा विशेष होता. <ref>[http://people.marathisrushti.com/articles/?goto=showarticle.php&lang=marathi&article=10058&cid=5 ].{{मृत दुवा}}</ref>
==श्री.ना पेंडसे यांनी लिहिलेली पुस्तके==
* असं झालं आणि उजाडलं (नाटक)
* एक होती आजी
* एल्गार
* कलंदर
* कामेरू
* खडकावरील हिरवळ
* गारंबीचा बापू
* घागर रिकामी रे
* च्क्रव्यूह
* तुंबाडचे खोत
* बेस्ट उपक्रमाची कथा
* महापूर
* यशोदा
* रंगमाळी
* रथचक्र (कादंबरी आणि नाटक)
* राजेमास्तर (नाटक)
* संभूसाच्या चाळीत (नाटक)
* हत्या
* हद्दपार
* हाक आभाळाची
* डॉ. हुद्दार (नाटक)
==संदर्भ==
|