"हबीब जालिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:

{{वर्ग}}
'''हबीब जालिब''' (उर्दू : حبیب جالب) (जन्म :२४ मार्च १९२८; मृत्यू : १३ मार्च १९९३) हे पाकिस्तानी क्रांतिकारी कवी होते. जालिब हे त्यांचे टोपणनाव (तखल्लुस). या शब्दाचा अर्थ स्वतःकडे आकर्षून घेणारा असा होतो. ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ता व कट्टर प्रजासत्ताकवादी राजनेता होते. त्यांनी लष्करी कायदा, हुकोमशाहीहुकूमशाही व राजकीय दडपशाहीचा कडाडून विरोध केला.

=प्राथमिक जीवन=
हबीब जालिब २४ मार्च, १९२८ रोजी [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] पंजाबमधील होशियापूर प्रांतात, मियानी अफगानाँं या गावात जन्मले, व त्यांचे नाव "हबीब अहमद" ठेवण्यात आले. वडलांचे नाव सुफी उनायत उल्लाह खान. हबीब यांचे बालपण गावातच झालेगेले. दुसर्‍या महायुद्धानंतर वडील त्यांना घेऊन दिल्लीत आले आणि तेथेच हबीब यांना अँग्लो उर्दूू अरेबिक स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत दाखल केले.

हबीब यांना अभ्यासापेक्षा काव्यातच अधिक रस होता. इ.स. १९४१पासून त्यांनी काव्य लेखनालाकाव्यलेखनाला सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या काव्यावर [[जिगर मुरादाबादी]] यांच्या काव्याची छाप होती. पुढे त्यांचे काव्य समाजवादी विचारसरणीकडे झुकले.

==पाकिस्तान==
[[भारताची फाळणी|भारताच्या फाळणीनंतर]] हबीब जालिब यांनी [[पाकिस्तान]]मध्ये स्थलांतर केले. त्यावेळी ते [[कराची]]मधील दैनिक इमरोज़ेच्याइमरोज़च्या कार्यालयात मुद्रितशोधक म्हणून काम करत. ते पुरोगामी लेखक होते. त्यांचे उत्साहवर्धक काव्यगायन ऐकायला बरेच श्रोते जमत. साधी शैली अंगीकारून, ते सोप्या भाषेत लिखाण करायचे, व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायचे. सभांमध्ये प्रेक्षकांच्यात अस्वस्थता निर्माण करण्यात यशस्वी होण्यामागे त्यांच्या सामाजिक व राजनैतिक जाणीवाजाणिवा, त्यांच्या शब्दांतली तळमळ, त्यांच्या आवाजातले संगीत व त्यांची भावनिक ऊर्जा ह्यांची सांगड जबाबदार होती.

==तुरुंगवास==
सोळा वर्षांहून अधिक काळ जालिब तुरुंगांत होते. जनरल अय्यूब खान, याह्याखान, ज़िया उल हक़, ज़ुल्फ़िक़ार अली भुट्टो या पाकिस्तानच्या प्रत्येक राज्यकर्त्याने त्यांना कारावासात टाकले. खून करण्याच्या प्रयत्‍नापासून ते राजद्रोहापर्यंतचे सर्व आरोप लावून जालिबना विविध प्रकरणांत गुंतविण्यात आले. ते कैदेत असताना त्यांचा मुलगा वैद्यकीय उपचारांअभावी मरण पावला. जालिब यांचा १९५८ साली जप्त केलेला पासपोर्ट १९८८ साली म्हणजे तीस वर्षांनी परत करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन लंडनला जायला निघालेल्या जालिब यांना कराची विमानतळावर परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले.

कारावासात असताना रेडिओवरून [[लता मंगेशकर]] यांची गाणी ऐकून जालिब यांनी तुरुंगातले अत्याचार सहन केले, आणि त्यांतूनच आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळाली असे ते नेहमी सांगत असत. हैदराबाद सिंधच्या तुरुंगात असताना त्यांनी ’लता’ नावाची एक मोठी कविताच त्यांनी लिहिली. जालिबची ’लता’वरील ती कविता आजही पाकिस्तानात प्रसिद्ध आहे. त्या कवितेतील काही ओळी :-

मीरा तुझ में आन बसी है

अंग वही है रंग वही है

जग में तेरे दास हैं कितने

जितने आकाश में हैं तारे
तेरे मधुर गीतों के सहारे

बीतें हैं दिन-रैन हमारे।

==हबीब जालिब यांचे काव्यसंग्रह==
Line २४ ⟶ ३५:
* हर्फे-सरे-दर
* हर्फे-हक़

==पुरस्कार==
जालिब यांना वारंवार तुरुंगात डांबणार्‍या पाकिस्तान सरकारने त्यांना २००९ साली मरणोत्तर ’निशान-ए-इम्तियाज़’ या पुरस्काराने सन्मानले.

(अपूर्ण)