"रामदास खुशालराव डांगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्राचार्य रामदास खुशालराव डांगे (जन्म : भालसी-अमरावती जिल्हा, १२...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
 
प्रती मिळविण्याचे हे काम खूप महत्त्वाचे होते, तसेच जबाबदारीचेही. अभ्यासासाठी नेमकी कोणती प्रत मिळवायची, याचे आडाखे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीने विचार करून तशी पार्श्‍वभूमी असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्यांचा अभ्यास सुरू केला. या अगोदर ज्ञानेश्वरीसारख्या श्रेष्ठ ग्रंथाच्या शुद्धीचे अनेक प्रयत्न झाले होते, पण मूळ प्रतीच निवडताना त्या सदोष निवडल्या गेल्यामुळे प्रमाण प्रत समोर आली नाही. डांग्यांना १९०७मध्ये मुंबईत माडगावकरांनी प्रसिद्ध केलेली प्रत महत्त्वाची वाटली. प्रा. हर्षे, प्रा. बनहट्टी यांनी केलेले काम अपूर्ण राहिले होते, पण ते चांगले काम होते. प्रचार्य डांग्यंनी काही हस्तलिखिते मिळविली. या पोथ्यांसाठी ते दोन वर्षे भारतभर फिरले. एक प्रत तर त्यांना अंदमानातून मिळाली.
 
==मराठी शब्दकोश==
तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी]] यांच्या प्रेरणेतून सन १९७०च्या सुमारास सुरू झालेले मराठी शब्दकोशाचे काम रामदास डांगे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. या अगोदर हे काम सुमारे २० वर्षे थांबून राहिले होते. त्यासाठी सन २००७मध्ये डांगे पुण्यात आले.
 
दोन दशके बंद असलेले काम करताना ते पुन्हा पहिल्यापासूनच सुरू करावे लागते. काळानुरूप भाषा बदललेली असते, नव्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत आलेले असतात. या सर्वांचा धांडोळा घेत हे काम पूर्ण करावे लागते. डोंगराएवढे हे सन २००७ ते २०१४ या काळात रामदास डांगे यांच्या नेतृत्वाखाली नेटाने पूर्ण करण्यात आले.
 
डांगे यांच्याकडे 'व्युत्पत्ती कोशा‘चे व संतकवी दासोपंतविरचित गीतार्णवाच्या शब्दकोशाचे काम राज्य मराठी विकास संस्थेने सोपविले होते, पण ते ते त्यांना पूर्ण करता आले नाही; त्यापूर्वीच १ जुलै २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.