'''गुजराती''' (मराठीत गुजराथी), ही [[भारत]] देशाच्या [[गुजरात]] राज्यामधील प्रमुख [[भाषा]] आहे. ही भाषा जुन्या गुजरातीपासून विकसित झाली असून आजच्याजगात घडीला२१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुमारे ६.६ कोटी लोक गुजराती भाषकगुजरातीभाषक आहेत.
गुजरातगुजरातेत तसेच [[मुंबई]]मध्ये गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारताबाहेर पूर्व [[आफ्रिका]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[इंग्लंड]]मध्ये बरेच गुजरातीभाषक आढळतात. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] आठव्या अनुसूचीनुसार गुजराती ही [[भारताच्या अधिकृत भाषा|भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी]] एक आहे. प्रसिद्ध भारतीय पुढारी [[महात्मा गांधी]], [[वल्लभभाई पटेल]] तसेच आघाडीचे उद्योगपती [[धीरूभाई अंबानी]], [[जे.आर.डी. टाटा]] इत्यादी व्यक्तींची गुजराती ही मातृभाषा होती.
==इतिहास==
ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत गुजराथी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जात असे. पुढे ती सध्या वापरली जाते त्या महाजन नावाच्या लिपीत लिहिली जाऊ लागली.