"श्रीनिवास हरि दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. श्रीनिवास हरि [[दीक्षित]] (जन्म : बुदलमुख (निपाणी), १३ डिसेंबर १९२०; मृत्यू : पुणे ३ ऑक्टोबर २०१३) हे एक मराठी लेखक होतहोते.. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तत्त्वज्ञानावरच्या अकरावी-बारावीच्या क्रमिक पुस्तकांसह त्यांनी आणखीही ग्रंथही लिहिले आहेत.
 
==शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द==
ओळ १३:
 
बी.ए.ची परीक्षा दीक्षित पहिल्या वर्गात पास झले. तेव्हा प्राचार्य बॅ.खर्डेकर यांनी त्यांना १॥-२ वर्षांकरिता व्याख्याता म्हणून नेमणूक दिली. आमचे प्रा. निकम दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळे ही जागा रिकामी होती. पुढे दीक्षित एम.ए. च्या परीक्षेत तत्त्वज्ञान विषयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले; त्यांना त्या विषयाचे तेलंग सुवर्ण पदकही मिळाले. त्यामुळॆ लगेचच १९४५ साली सावंतवाडीच्याे राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये व १९४६ ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम करावयास मिळाले. पुढे मुंबई सरकार चालवीत असलेल्या धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये त्यांची नेमणूक झाली. तेथे तीन वर्षे काम करूुन ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आले व येथूनच १९७८ अखेर निवृत्त झाले.
 
==अन्य काही उल्लेखनीय गोष्टी==
इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस, इंडिया फिलॉसॉफिकल असोसिएशन यांसारख्या त‍त्त्वज्ञान विषयाला वाहिलेल्या संस्थांचे श्री.ह. दीक्षित आजीव सभासद होते.१९६४ साली पन्हाळा येथे इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशनचे अधिवेशन त्यांनी आयोजित केले होते.
 
दीक्षित हे, १९६९ साली धारवाड येथे भरलेल्या इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेसमध्ये ते नीतिशास्त्र व सामाजिक त‍त्त्वज्ञान या विभागाचे अध्यक्ष होते.
 
श्री.ह दीक्षित महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे उद्‌गाते होत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची वाटचाल १९८० साली सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. परिषदेचे पहिले अध्यक्ष प्रा.दि.य.देशपांडे होते. त्यांच्यानंतर दुसरे अध्यक्ष प्रा.दीक्षित स्वतः होते.१९८४ व १९९७ साली परिषदेची दोन अधिवेशने (म्हणजे पहिले व चौदावे अधिवेशन) कोल्हापुरात आयोजिली होती.ह्या दोन्ही अधिवेशनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.२००८ सालच्या रौप्यमहौत्सवी अधिवेशनावेळी त्यांची शरीरप्रकृती त्यांना साथ देत नव्हती. त्यामुळे इच्छा असूनही ते या अधिवेशनात सहभागी होऊ शकले नाही.
 
==ग्रंथलेखन==
राजाराम कॉलेजात असतानाच प्रा. श्री.ह. दीक्षित यांनी ’भारतीय तत्त्वज्ञान’ व ’नीतिमीमांसा’ ही दोन पुस्तके लिहिली. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांना त्या त्या वर्षाची सरकारी व बिनसरकारी अशी पारितोषिके मिळाली.
 
पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांना व्यासंग खूप सखोल व सर्वांगीण असा होता. ह्या दोन्हीतील मूळ ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला होता.मानवी जीवनाचे भरण-पोषण कोणत्या प्रकारे शकेल याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.’भारतीय तत्त्वज्ञान’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ याची साक्ष देणारा आहे. ह्या ग्रंथातील मराठी भाषेचे सौष्ठव पाहिले की त्याची प्रचिती सामान्य वाचकालाही येऊ शकेल. अत्यंत सोपी भाषा, सुबोध विवेचन आणि सरळ व सुस्पष्ट निवेदन ही त्यांची वैशिष्ट्ये होत. महाराष्ट्र शासनाने तीन वेळा ’उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार’ देऊन या ग्रंथाचा गौरव केला आहे.
 
==कोल्हापूरच्या फडके प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली श्री.ह. [[दीक्षित]] यांची काही पुस्तके==
Line २३ ⟶ ३२:
* नैतिक आणि सामाजिक तत्त्वज्ञान
* भारतीय तत्त्वज्ञान, वगैरे
 
 
==संदर्भ==
[http://www.maharashtraphilosophyconference.com/MPC/Mulakhati.html महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा वृत्तान्त]