"मुकुंद श्रीनिवास कानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
''डॉ.'' '''मुकुंद श्रीनिवास कानडे''' (३ डिसेंबर, इ.स. १९३१ - २५ जून, इ.स. २०१२) हे [[मराठी भाषा|मराठीतले]] एक लेखक, समीक्षक, कोशकार व संत साहित्याचे अभ्यासक होते.
==जीवन ==
पदव्युत्तर शिक्षणानंतर लगेच ते मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. [[दासबोध|दासबोधाचा]] भाषाशास्त्रीय अभ्यास या विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली. संत साहित्य आणि अर्वाचीन साहित्यावरील कानड्यांचे अभ्यासपूर्ण लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. नाटक आणि नाट्यसमीक्षा या विषयावर लेखन व अनेक ग्रंथांचे संपादनही कानडे यांनी केले. इ.स.१९७६ ते १९९१ या काळात ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] मराठी विभागात अध्यापन करत होते. तेथूनच विभागप्रमुख म्हणून ते ३१ डिसेंबर १९९१ला निवृत्त झाले. विद्यापीठात मु.श्री.कानडे हे संत ज्ञानदेव अध्यासन चालवीत. या अध्यासनासाठी त्यांनी खूप काम केले. अध्यासन मोठे करण्यात त्यांचा मोठा हातभार होता.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते माजी सदस्य होते. त्यानी विश्वकोशातील काही लेखांचे लेखन केले आहे. रा.शं. नगरकरांच्या बरोबर कानडे यांनी रामदासस्वामी, नामदेव आणि संत एकनाथ यांच्या वाङ्मयात येणाऱ्या शब्दांचे कोश केले आहेत.
मु.श्री.कानडे निवृत्त झाल्यावर त्यांच्या गौरवार्थ दोन ग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरले. त्यासाठी ’डॉ.मु.श्री.कानडे मित्रमंडळ’ स्थापन करण्यात आले. या मंडळात डॉ.कल्याण काळे, डॉ.गं.ना.जोगळेकर, डॉ.दत्तात्रय पुंडे, डॉ.प्र.ज.जोशी, मीरा धांडगे, डॉ.र.रा.गोसावी, रा.शं.नगरकर, डॉ.श्रीपाल सबनीस, डॉ.सु.रा.चुनेकर आणि डॉ.स्नेहल तावरे आदी विद्वान मंडळी होती. मंडळाने ’आजचे नाटककार’ हा ग्रंथ प्रकाशित केलाच, शिवाय डॉ.मु.श्री.कानडे यांच्या सत्काराच्या निमित्ताने ’संतसाहित्य अभ्यासाच्या काही दिशा’ या विषयावर झालेल्या चर्चासत्राचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.
|