"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
==जीवन==
 
वडील श्रीनिवास कृष्ण अर्थात आण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृतचे अध्ययन केल्यावर {{लेखनाव}} यांनी पुण्यात [[विष्णुशास्त्री बापट]] यांनी सुरू केलेल्या [[आचार्यकुल|आचार्यकुलात]] तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. त्यांनी, पुण्याच्या [[वेदशास्त्रोत्तेजकसभा|वेदशास्त्रोत्तेजकसभेची]] परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत गेल्यावर एक वर्ष कारकुनाची नोकरी केल्यावर - आणि पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आल्यावर - [[विश्वनाथ विनायक पेंडसे|विश्वनाथ विनायक अर्थात् आप्पा पेंडसे]] यांच्या प्रेरणेने ते पुण्याला परत आले. आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे शिक्षणाधिकारी [[रंगाचार्य रेड्डी]] यांच्यामुळे त्यांना इंग्रजी पहिलीत थेट उडी मारता आली. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक [[नीलकंठ वा. किंकर|नी.वा. तथा बापूसाहेब किंकर]] यांनी त्यांची परीक्षा घेऊन त्यांना इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठीची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची त्यांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी [[अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांनी करून घेतली होती. पुढील काळात [[सं-म-त]] अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ञ [[विश्वनाथ आबाजी खैरे]], १९६०च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ [[अरविंद लोणकर]], कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक [[सखाराम हरी देशपांडे]], संस्कृतज्ञ आणि मराठी कवी [[वसंत संतू पाटील]] हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र. पुढचे शिक्षण (बी.ए. १९५१, एम्.ए. १९५६) कृष्ण श्रीनिवासांनी स्वत:च्या हिमतीवर, जवळच्या मित्रांच्या मार्गदर्शनाच्या आधारावर, आणि फोटोग्राफीसह अनेक उद्योगांतून अर्थार्जन करून घेतले. फोटोग्राफीचे शिक्षण कृष्ण श्रीनिवासांना त्यांचे वडील बंधू [[विनायक श्रीनिवास अर्जुनवाडकर]] आणि एका पिढीतील प्रख्यात फोटोग्राफर [[डॉक्टर एम्. (मोरोपंत) कानिटकर]] यांच्याकडून मिळाले.
 
पुढील काळात [[सं-म-त]] अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ञ [[विश्वनाथ आबाजी खैरे]], १९६०च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ [[अरविंद लोणकर]], कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक [[सखाराम हरी देशपांडे]], संस्कृतज्ञ आणि मराठी कवी [[वसंत संतू पाटील]] हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र. पुढचे शिक्षण (बी.ए. १९५१, एम्.ए. १९५६) कृष्ण श्रीनिवासांनी स्वत:च्या हिमतीवर, जवळच्या मित्रांच्या मार्गदर्शनाच्या आधारावर, आणि फोटोग्राफीसह अनेक उद्योगांतून अर्थार्जन करून घेतले. फोटोग्राफीचे शिक्षण कृष्ण श्रीनिवासांना त्यांचे वडील बंधू [[विनायक श्रीनिवास अर्जुनवाडकर]] आणि एका पिढीतील प्रख्यात फोटोग्राफर [[डॉक्टर एम्. (मोरोपंत) कानिटकर]] यांच्याकडून मिळाले. स्वातंत्र्यवीर [[सावरकर]] यांचे डावीकडे चेहरा करून विचारमग्न असलेले छायाचित्र अर्जुनवाडकरांनी टिपले होते.
[[लीला अर्जुनवाडकर|लीला देव]] यांच्याशी अर्जुनवाडकरांचा १९५४मधे विवाह झाला. [[लीला अर्जुनवाडकर]] यांनी पुण्याच्या [[स.प. महाविद्यालय|स. प. महाविद्यालयात]] संस्कृत आणि पाली भाषांचे आणि वाङ्मयाचे अध्यापन केले; त्या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या (विशेषत: महाकवी कालिदासाच्या) अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत.
 
संस्कृताच्या भारतातील सद्य:स्थितीचा अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने स्थापलेल्या संस्कृत कमिशनमधे प्राच्यविद्यातज्‍ज्ञ [[रामचंद्र नारायण दांडेकर]] यांचे सचिव म्हणून अर्जुनवाडकरांनी काम केले आणि कमिशनबरोबर भारतभर प्रवास केला (१९५६-५७). ठिकठिकाणच्या संस्कृतज्ञांशी कमिशनच्या वतीने संस्कृतातून संवाद साधून त्यांचे म्हणणे कमिशनपुढे हिंदी-इंग्रजीतून मांडणे हाही त्यांच्या कामाचा भाग होता.
 
==अध्यापन==
अर्जुनवाडकरांनी पुण्याचे [[नूतन मराठी विद्यालय]] (१९५०-५२), [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय]] (१९५५-६०), [[स.प. महाविद्यालय]] (१९६१-७९), कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ (१९७३-७४), आणि मुंबई विद्यापीठ (१९७९-८६) या ठिकाणी संस्कृत, अर्धमागधी, आणि मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातही काही काळ अध्यापन केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रिज विद्यापीठापर्यंत अर्जुनवाडकरांनी संस्कृत, योग, उपनिषदे, रससिद्धान्त या विषयांवर्व्याख्याने दिली.संस्कृतमध्ये काव्येय, विडंबनकाव्ये लिहिली.
 
==संस्था==
ओळ ५०:
 
{{लेखनाव}} यांनी [[आनंदाश्रम संस्था|आनंदाश्रम संस्थेचे]] विश्वस्त म्हणूनही काही वर्षे काम केले. [[आनंदाश्रम संस्था|आनंदाश्रमाचे]] आधुनिकीकरण आणि [[आनंदाश्रम संस्था|आनंदाश्रमातल्या]] दुर्मीळ हस्तलिखितसंग्रहाचे संगणकीय जतन (digitization) व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. (हे काम आता [[राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशन (National Mission for Manuscripts)]]-च्या कामाचा भाग म्हणून चालू आहे.)
 
==पत्नी==
[[लीला अर्जुनवाडकर|लीला देव]] यांच्याशी अर्जुनवाडकरांचा १९५४मधे विवाह झाला. त्यांच्या पत्नी [[लीला अर्जुनवाडकर]] यांनी पुण्याच्या [[स.प. महाविद्यालय|स. प. महाविद्यालयात]] संस्कृत आणि पाली भाषांचे आणि वाङ्मयाचे अध्यापन केले; त्या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या (विशेषत: महाकवी कालिदासाच्या) अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत.
 
==कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे प्रकाशित साहित्य==