"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
 
== जीवन ==
कालीदासआख्यायिका:- कालिदास हा बालपणी न शिकलेला व कमी बुद्धी असलेला होता. त्याची पत्नी ही प्रकांड पंडिता व विदुषी होती. लग्न झाल्यावर त्यास त्याच्या पत्नीने विचारले:'''अस्ति कश्चित वाग्विशेषः'''?(वाङ्‌मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे काय?). कालिदास या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होता. पत्नीचे बोलणे असह्यअपमास्पद होऊनवाटून त्याने जंगलाची वाट धरली आणि तेथे काली देवीची प्रार्थना व तपस्या करून वरदान मिळविले. परत आल्यावर त्यासत्यानेपत्नीच्या त्याचेप्रश्नाला पत्नीनेउत्तर विचारले:'''अस्तिम्हणून कश्चित’अस्ति’,कश्चित’ वाग्विशेषः'''?(आणि वाङमयाबद्दल काही विशेष आहे काय?). ते एकुन त्याने’वाग्’ या तीन शब्दांनी सुरु होणारे साहित्य रचले,अशी आख्यायिका आहे.
 
विदर्भ देशाची राजकन्या इंदुमती हिचे स्वयंवर मांडले आहे. देशोदशी राजेमहाराजे या स्वयंवरात भाग घेण्यासाठी आपापल्या लवाजम्यासह दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष स्वयंवराला प्रारंभ झाल्यावर तो विस्तीर्ण राजप्रासाद देशोदेशींच्या राजेरजवाडय़ांनी आपापली आसने भूषविल्यानंतर अधिकच शोभायमान झाला आहे. पृथ्वीवरचे सगळे ऐश्वर्य, शौर्य, सौंदर्य जणूकाहीजणू काही अतिविशाल स्वयंवर मंडपात एकवटले आहे. स्वरूपसुंदर इंदुमती कोणाला माळ घालील याची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून राहिली आहे. इंदुमती आपली प्रिय सखी सुनंदा हिच्यासोबत त्या मंडपात दाखल झाली. हातात वरमाला घेतलेली इंदुमती एकेका राजाचे सूक्ष्म निरीक्षण करीत सावकाश एकेक पाऊल टाकत पुढे पुढे जाऊ लागली. चतुर सुनंदा मोठय़ामोठ्या मार्मिक शब्दांत एकेका राजाचे वर्णन करू लागली. हा प्रसंग रंगवून सांगतांना महाकवी कालिदासाने एक अतिरम्य अशी उपमा वापरली आहे. उपमा कालिदासस्य असे म्हणतातच. ते सार्थ आणि समर्पक वाटावे, अशी ही उपमा आहे. मूळ श्लोक असा आहे -
{{वचन|संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा ।
नरेंद्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपाल: ।। | रघुवंश ६.६७}}
 
रात्रीच्या वेळी राजमार्गावरुनराजमार्गावरून एखादी दिव्याची ज्योत कोणीतरी पुढे पुढे नेत असावे आणि त्या ज्योतीचा प्रकाश राजमार्गावर असलेल्या मोठमोठय़ा इमारतींच्या दर्शनी भागावर पडत राहावा., ज्योत पुढे गेली की मागच्या इमारतींचा दर्शनी भाग अंधारात अदृश्य व्हावा., ज्योत ज्या महालासमोरुन चालली असेल तेवढाच महाल प्रकाशमान व्हावा, त्याचप्रमाणे इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून जाई त्याचा त्याचा चेहरा त्या वेळेपुरता उजळून निघे, आणि इंदुमती पुढे गेल्यावर ती निराशेने काळाठिक्कर पडे. किती योग्य उपमा आहे पाहा ! इंदुमती तिच्या हातातील वरमाला आपल्या गळ्यात घालील, अशा आशेने त्या त्या राजाचा चेहरा फुलून येई आणि इंदुमती पुढे जाताच त्याचे वदनकमल म्लान होई. किती योग्य उपमा आहे पाहा ! या उपमेवरुनउपमेवरून कालिदासाला दीपशिखा कालिदास असे गौरविले जाते.
 
आषाढ महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा ही तिथी महाकवी कालिदास जयंती म्हणून मानली जाते.
 
==कालिदासाच्या नावाच्या संस्था==
* महाकवी कालिदास साहित्य कला संस्कृती मंच, वडगाव धायरी, पुणे. या संस्थेने १४ जुलै २०१३रोजी ’[[कालिदास साहित्य संमेलन]]’ भरवले होते.
* महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
* कालिदास अकादमी, उज्जैन. ही संस्था दरवर्षी कालिदास समारोह आयोजित करते.
* कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक
* महाकावी कालिदास नाटय़मंदिर, मुलुंड (मुंबई)
 
 
==कालिदास सन्मान==
* कालिदास सन्मान पुरस्कार : हा भारतातील मध्य प्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी इ.स. १९८०सालापासून देण्यात येणारा मानाचा पुरस्कार आहे. हा सन्मान मिळालेल्या व्यक्ती -
** सुमती मुटाटकर (२००२)
** अनुपम खेर (२०११)
** गिरीश कर्नाड
** बाबासाहेब पुरंदरे (२००७)
** उस्ताद अल्लारखाँ (१९९६)
** मल्लिकार्जुन मन्सूर (१९८१)
** कन्नड कवी डॉ. चंद्रशेखर कंबार
** पु.ल. देशपांडे (१९८९)
** पंडित बिरजू महाराज
** विजय तेंडुलकर
** सत्यदेव दुबे
 
* कोकण मराठी परिषदेचा ‘कालिदास पुरस्कार’ : हा गोमंतकीय साहित्यिक, समीक्षक पु. शि. नार्वेकर यांना २०१२ साली देण्यात आला.
* महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार : हरिभाऊ मुरकुटे (२०११); हरेकृष्ण शतपथी (२०१३)+अनेक
 
== काव्ये ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले