'''दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा''' ही [[कोल्हापूर]] येथे असलेली साहित्य संस्था आहे. ही संस्था [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या प्रेरणेने इ.स. १९८७ साली स्थापन झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडचे [[सांगली]], [[सातारा]], [[सोलापूर]], [[कोल्हापूर]] हे चार जिल्हे. '''दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा''' महाराष्ट्र सर्कारच्यासरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून दरवर्षी ५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त करीत असली तरी, ही संस्था या चार जिल्ह्यांतील एखाद्या गावी, किंवा महाराष्ट्राच्याकार्यक्षेत्राच्या किंचित बाहेर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात व बेळगाव-निपाणी येथेयेथेही साहित्य संमेलने भरवते. संस्थेची आत्तापर्यंत आतापर्यंत [[कोल्हापूर]], [[बेळगाव]], [[सांगली]], [[निपाणी]], कुंभारगाव ([[सातारा जिल्हा]]), येडेनिपाणी ([[सांगली जिल्हा]]), नागठाणे ([[सांगली जिल्हा]]), रेणावी ([[सांगली जिल्हा]]), चिखली ([[रत्नागिरी जिल्हा]]?), माचीगड ([[बेळगाव जिल्हा]]) अशा विविध ठिकाणी साहित्य संमेलने झाली आहेत. [[ग. ल. ठोकळ]], तर्कतीर्थ [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], [[रणजित देसाई]], [[आनंद यादव]], [[शिवाजी सावंत]], प्रा. [[म. द. हातकणंगलेकर]], प्रमोद कोपर्डे, वसंत केशव पाटील, प्रा. [[एन. डी. पाटील]], अनंत तिबिले, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. [[गंगाधर पानतावणे]], प्रा. [[फ. मुं. शिंदे]], [[अशोक नायगावकर]] आदींनी आतापर्यंत संमेलनाध्यक्षपद भूषवले आहे. '''दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे'''चे २३वे साहित्य संमेलन कराड[[कऱ्हाड]] येथे २० जानेवारी २०१३ या दिवशी झाले. ’उपरा’कार [[लक्ष्मण माने]] संमेलनाध्यक्ष होते.