"सत्त्वशीला सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा.
ओळ २:
 
==निवृत्तीनंतर==
निवृत्तीनंतर त्यांनी भाषाविषयक विविध बौद्धिक उपक्रमांत भाग घेण्यास सुरुवात केली. ’मराठी शुद्धलेखन’ या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी ’रुची’, ’भाषा आणि जीवन’ या नियतकालिकांतून आणि मराठी वृत्तपत्रांतून लेख लिहिले, वाचकांच्या पत्रव्यवहारांत त्यांनी आपले विचार मांडले आणि इतरांचे गैरसमज दूर करून त्यांनी त्यांच्या मतांमधील चुकीच्या कल्पना दुरुस्त करायचा प्रयत्न केला. ’मानस-सरोवर’ हे गेल्या काही वर्षांपासून चुकीने मान-सरोवर असे लिहिले जात असल्याबद्दल त्यांनी लेख लिहून व भारत सरकारशी पत्रव्यवहार करून आपली मते ठामपणे मांडली. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी सत्त्वशीला सामंत यांचा मुंबईतील डॉ. श्रीखंडे यांच्यावर एक सुरेख ललित लेख छापून आला होता.
 
==सत्त्वशीला सामंत यांचे मराठी शुद्धलेखनविषयक विचार==
सत्त्वशीलाबाई शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांच्या पुरस्कर्त्या होत्या. शुद्धलेखनाचे नियम हे कृत्रिमरीत्या तयार करायचे नसतात, तर बांधायचे असतात असे त्या म्हणत. शुद्धलेखनाचे जुने नियम भाषेच्या विकासक्रमामध्ये घडत गेलेले असल्यामुळे त्या नियमांचा त्या पुरस्कार करीत. शुद्धलेखनाच्या नव्या नियमांना विरोध करण्यामागे त्यांची ही तात्त्विक भूमिका होती. या भूमिकेपायी त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले . सरकारदरबारी पत्रव्यवहार केला. त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र, त्या मागे हटल्या नाहीत. जुन्या नियमांबद्दल त्या आग्रही असल्या, तरी शुद्धलेखनाचे नियम अजिबातच नको, असे म्हणण्याला त्यांचा विरोध होता . शुद्धलेखनाचे नियम हद्दपार करणे भाषेसाठी घातक असल्याचे त्या आवर्जून सांगत. शुद्धलेखन म्हणजे भाषिक शिस्त आहे, असे नमूद करीत त्या या शिस्तीची तुलना वाहतुकीच्या नियमांशी करीत. ' वाहतुकीची शिस्त मोडली, की प्राणाशी गाठ पडते; त्याप्रमाणेच भाषिक शिस्त मोडली, की सांस्कृतिक मरण जवळ ओढवून घेतले जाते,' असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच त्या सदैव शुद्धलेखनाच्या बाजूने झटत राहिल्या. भाषेबद्दलची कमालीची आस्था हीच त्यांची यामागची प्रेरणा होती. या प्रेरणेतूनच त्यांनी 'मराठी शुद्धलेखन प्रणाली' हे पुस्तक लिहिले. मराठी - हिंदी - इंग्रजी या तिन्ही भाषांमधील शब्दांचा व्यवहारोपयोगी कोशही त्यांनी ' शब्दानंद ' या नावाने सिद्ध केला. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांची आवर्जून दखल घेतली गेली. त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले. भाषाविषयक बौद्धिक उपक्रमात त्या आवर्जून सहभागी होत. हा सहभाग मुक्तपणे व्हावा, यासाठी त्यांनी १९८६मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भाषेबद्दलची अतिशय सूक्ष्म जाण त्यांना होती. म्हणूनच त्या याबाबत अतिशय संवेदनशील होत्या. भाषेची मोडतोड होताना दिसली, तंत्रज्ञानामुळे अक्षरांच्या वळणात बदल झालेले दिसले, की त्या व्यथित होत. भाषिक समूहाबद्दलचा अहंगंड वाढत असतानाच्या आजच्या काळात भाषेबद्दलची संवेदनशीलता मात्र सामूहिक पातळीवर कमी होत आहे. अशा काळात भाषेच्या शुद्धतेचा आग्रह धरणाऱ्या सामंतांचे जाणे हे खरोखरीच पोकळी निर्माण करणारे आहे .
 
==सत्त्वशीला सामंत यांचे प्रकाशित साहित्य==