"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
 
जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.
 
==काव्ये==
शेक्सपियरने अनेक (चारोळ्या)सुनीते (sonnets) लिहिली आणि त्यांशिवाय अनेक दीर्घकाव्ये. त्यांतील काही दीर्घकाव्ये ही अशी :-
 
* अ लहर्स कंप्लेन्ट
* द पॅशनेट पिल्ग्रिम
* द रेप ऑफ ल्यूक्रेसी
* व्हीनस ॲन्ड ॲडॉनिस
 
 
== जीवन ==
विल्यम शेक्सपियर यांचा जन्म [[इंग्लंड]] देशातील वार्विकशायरवॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-ऑन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.
 
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात [[लॅटिन]] भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आणि [[इटालियन भाषा|इटालियन]] भाषाशिक्षणासह चर्च मधीलचर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई., मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
 
इ.स. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अ‍ॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. इ.स. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून [[लंडन]] गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणार्‍याहोणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.
 
त्यानंतर विल्यमने स्वतःच नाटके लिहून ती सादर करायला सुरुवात केली आणि लोकांना ती आवडायलाही लागली. त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली. या काळात विल्यम शेक्सपियर यांनी ३६ नाटके आणि १५४ सुनीते लिहिली.
 
हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम शेक्सपियर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपियर स्वतःची नाटके या नाट्यगृहात मध्ये करू लागले. आता होणारेमिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले.
 
इ.स. १६१० साली शेक्सपियर पुन्हा आपल्या स्ट्रॅटफोर्ड गावात येऊन राहू लागले, ते कामापुरतेच लंडनला जात येत असत. इ.स. १६१६ साली स्ट्रॅटफोर्ड या गावातच विल्यम शेक्सपियर यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला.
 
== नाटके ==