"नारायण वामन दिवाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पंडित नारायण वामन दिवाण (जन्म कोल्हापूर १३ डिसेंबर १९२७; मृत्यू पुणे, ३१ ऑक्टोबर २०१२) हे पुणे शहरातले एक संगीत कलावंत घडवणारे शिक्षक होते. त्यांनी इ.स. १९४० ते १९५० या काळात दरबार गवई पंडित केशवबुवा इंगळे यांच्या इचलकरंजी येथील गुरुकुलात संगीत शिक्षण घेतले. १९५१मध्ये त्यांनी पुण्यात आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच काळात त्यांना संगीत अलंकार ही पदवी मिळाली. १९५३मध्ये ना.वा. दिवाण यांनी पुण्यातील नारायण पेठेत सरस्वती संगीत अकादमीचीअकादमी स्थापना केली. १९५७मध्ये ते अखिल भारतीय गंधर्व मंडळामध्ये सहभागी झाले, आणि शेवटपर्यंत ते तेथेच काम करीत होते. पूर्वी नारायण पेथेत असलेले सरस्वती संगीत विद्यालय आता पुण्यातच पण बिबवेवाडीला आहे.
 
१९५७ ते १९७५ या काळात ना.वा. दिवाण यांनी मुलींच्या एस.एस.डी.टी. महाविद्यालयात संगीत शिकवण्याचे काम केले. त्यांना १९६९मध्ये त्यांना संगीत आचार्यसंगीताचार्य हा पुरस्कार देण्यात आला. सरस्वती संगीत विद्यालयाच्या माध्यमातून ना.वा. दिवाण यांनी अनेक कलावंत घडवले. ते आर्य संगीत प्रसारक मंडळाचेही सदस्य होते. भारत गायन समाज या संस्थेशीही त्यांचा संबंध होता. भारत गायन समाजाच्या ९६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत शिक्षक पं. ना. वा. दिवाण यांना ’आबासाहेब मुजुमदार पुरस्कार’ देण्यात आला.
 
पंडित ना. वा दिवाण यांच्या संस्थेमधून संगीत विशारद झालेल्यांची संख्य़ा १००० आहे. तर संगीत अलंकार झालेले ८०० आहेत. ३ जण संगीताचार्य म्हणून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या सरस्वती संगीत विद्यालयामार्फत पुणे, सासवड, बारामती, भोर, पिंपरी-चिंचवड या केंद्रांवरून २००० विद्यार्थी परीक्षेला बसत असत. मास्टर ईव्हेन्ट्‌स आणि कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशनच्या वतीने होत असलेल्या राज्यस्तरीय गायन, वादन आणि नृत्य स्पर्धेचे ते प्रमुख सल्लागारही होते.
 
वयाच्या ८५व्या वर्षी त्यांचे पुण्यात देहावसन झाले.