"तेलुगू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |

ओळ ४०:
१. '''अन्नमाचार्य''' (इसवी सनाचे १५वे शतक) : अन्नम्माचार्य या कवीने तेलुगूच्या बोलीभाषेत तिरुपतीच्या लीलावर्णनाची ३२००० पदे रचली असे सांगतात. त्या पदांपैकी १३०० पदे उपलब्ध आहेत.

२. '''अलसानि पेदन्न''' (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध) : या कवीने मनुचरित्र नावाचे काव्य रचले. ती कथा त्याने मार्कंडेय पुराणातून घेतली होती. सर्व दृष्टीने अप्रतिम वठलेल्या या काव्याने राजा कृष्णदेवराय इतका प्रभावित झाला की त्याने पेदन्नाला आंध्रकवितापितामह अशी पदवी प्रदान दिली.

तिकन्नाने सोमयाग केला म्हणून लोक त्याला तिक्कन्न सोमयाजी म्हणू लागले. गणपती काकतीय या विद्वानाने आंध्रात एकदा एक वादसभा भरवली होती. तिक्कन्नाने त्या सभेत भाग घेऊन जैन आणि बौद्ध पंडितांचा पराभव करून वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले.
तिक्कन्नाचे तेलुगू आणि संस्कृत या दोनही भाषांवर प्रभुत्व होते. सोमयाग केल्यावर तिक्कन्नाने, नन्नय्याने अपुरे ठेवलेल्या महाभारताच्या तेलुगू अनुवादाचे काम सुरू केले. नन्नय्या ज्याचा अनुवाद करता करता मरण पावला ते वनपर्व हे अशुभ पर्व आहे या समजुतीने त्याने ते तसेच अर्धवट ठेवून विराट पर्वापासून ते शेवटच्या पर्वापर्यंतचे भाषांतर पूर्ण केले. तिक्कन्नाचा हा पराक्रम पाहून मनुमसिद्धी राजाने त्याला कविब्रह्म अशी पदवी दिली.

पुराणकाळाच्या प्रारंभी चालुक्य नरेश राजराज हा आंध्र प्रदेशावर राज्य करीत होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेत पंडित असलेला नन्नय्यभट्ट, हा त्या राजराज राजाचा कुलगुरू होता. हा राजा जेव्हा गादीवर आला तेव्हा प्रजाजन वैदिक धर्मातील श्रेष्ठ तत्त्वे विसरून विकृत धर्मकल्पनांच्या आहारी गेले होते. या गोष्टीने चिताक्रांत झालेल्या राजाने नन्नय्यभट्टाला सल्ला विचारला. नन्न्य्याने सुचवले की महाभारताचे तेलुगू भाषांतर करावे, म्हणजे ते वाचून लोकांना खऱ्या धर्माचे ज्ञान होईल. राजाने नन्नय्यानेच भाषांतर करावे अशी इच्छा व्यक्त केली. नन्नय्याला जाणवले की त्या काळची तेलुगू भाषा, सुबद्ध व्याकरण नसल्याने महाभारताचा अनुवाद करण्यास असमर्थ आहे. तेव्हा नन्नय्याने ’आंध्रशब्दचिंतामणि’ आणि ’लक्षणसार’ हे दोन ग्रंथ निर्माण केले, आणि त्यांत तेलुगूमधील सगळी शब्दसंपदा एकत्र केली. नंतर नन्नय्यभट्ट महाभारताच्या अनुवादाच्या कामाला लागला. त्याने महाभारतातील आदिपर्व आणि सभापर्व याचे भाषांतर पूर्ण केले, मात्र तिसरे वनपर्व अर्धे झाले असतानाच नन्नय्याला मृत्यूने गाठले. महाभारत अर्धवट राहिले खरे, पण झालेला अनुवाद इतका सरस होता की नन्नय्याला तेलुगूचा आदिकवी अशी उपाधी प्राप्त झाली. अर्धवट राहिलेले भाषांतर पुढे तिक्कन्न सोमयाजी आणि यर्रापगड यांनी पुरे केले.

नन्नय्यभट्टाचे महाभारताचा तेलुगू अनुवाद करायचे अपुरे काम तिक्कन्न सोमयाजीने १३व्या शतकात पुरे करत आणले. पण जे लिहीत असताना नन्नय्याचा मृत्यू ओढवला ते वनपर्व अशुभ असावे, अशा समजुतीने तिक्कन्न सोमयाजीने वनपर्व अर्धवटच ठेवले. त्या पर्वातील २९००पैकी १६०० श्लोकांचे काम झाले नव्हते. त्यासाठी १४वे शतक उजाडावे लागले. त्या शतकात निपजलेल्या व अन्नवेम्मा रेड्डी या राजाच्या आश्रयाला असलेल्या यर्राप्रगड कवीने वनपर्वाचे काम पूर्ण केले. मात्र श्लोकरचना न करता त्याने वनपर्वाचा अनुवाद प्रबंधरचनेत (निर्मळ प्रासादिक अशा गद्यात) केला. तिक्कन्ना आणि यर्राप्रगड यांची भाषाशैली इतकी एकसारखी आहे.की, दोघांच्या रूपांतरातला फरक सांगणे कठीण आहे. यर्राप्रगडला लोक प्रबंधपरमेश्वर म्हणू लागले, आणि नन्नय्य, तिक्कन्न आणि यर्राप्रगड यांना कवित्रय असे नाव पडले.

काव्यप्रबंध काळाचा मुकुटमणी. लहानपणीच श्रीनाथाने तेलुगू व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि तो थोडीफार कविताही करू लागला होता. तरुणपणी याने श्रीहर्ष कवीच्या [[नैषधीय]] या संस्कृत महाकाव्याचा तेलुगू अनुवाद केला. त्या अनुवादित ग्रंथाला ’शृंगार नैषध’ असे म्हणतात. तेलुगूतल्या पाच महाकाव्यातले हे एक आहे. या काव्याने श्रीनाथ कवीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि कोंडविच्डूया या राजाकडे आश्रयही. राजाने त्याची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली.

इ.स. १४२५च्या सुमारास श्रीनाथने राजाश्रय सोडला आणि तो देशाटनाला निघाला. प्रवासातच त्याने ’हरविलाससमु’ नावाचे काव्य रचले. त्या काव्यात शिवलीलांचे मनोहर वर्णन केले आहे. पुढे श्रीनाथ विजयनगरला गेला. त्यावेळी तेथे कृष्णदेवराय गादीवर होता. त्याच्या दरबारात असताना श्रीनाथने, गौड डिंडिमभट्ट नावाच्या कवीला शास्त्रार्थात हरविले. या विजयामुळे श्रीनाथला कविसार्वभौम ही पदवी मिळाली. राजाने त्याचा सुवर्णाभिषेकही केला.

त्यानंतर श्रीनाथ तेलंगणातील राचकोंडाचा राजा सर्वज्ञसिंगम याच्या दरबारी आणि नंतर राजमहेंद्रवरम्च्या वीरभद्र रेड्डी या राजाच्या आश्रयाला गेला. तेथे त्याने ’भीमखंड’,’काशीखंड’ आणि ’पल्नाडि वीरचरित्रमु’ ही काव्ये रचली. या शेवटच्या काव्यात श्रीनाथची प्रतिभा सर्वोच्चबिंदूला पोचली होती. या कवीचे बहुतेक आयुष्य मानमरातबात आणि वैभवविलासात गेले.

हा कृष्णा जिल्ह्यातल्या मौव नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला. लहानपणी याचे नाव वरदय्या होते. त्याला तेलुगू व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. कुचिपुडी या गावाला येऊन त्याने संगीत आणि नाट्य या विषयांचे अध्ययन केले, व नंतर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यामुळे लोक त्याला क्षेत्रय्या म्हणू लागले.

पुढे तंजावरच्या विजयराघव नावाच्या राजाकडे क्षेत्रय्याला आश्रय मिळाला. तेथे राहून त्याने खूप काव्यरचना केली. तो पराकाष्ठेचा श्रीकृष्णभक्त होता. त्याची भक्ती अर्जुनाप्रमाणे सख्ख्या भावासारखी आणि त्याचवेळी राधेप्रमाणे पत्नीभावाची होती. आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाची मधुराभक्ती केली. श्रीकृष्णाने क्षेत्रय्याला एकदा दर्शन दिले, असे म्हणतात.