"रोहिणी जयदेव हट्टंगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
 
'''रोहिणी हट्टंगडी''' या रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड अँटनबरो निर्मित ' गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा' च्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोचलेल्यापोहोचलेल्या त्या प्रख्यात अभिनेत्री आहेत.
 
==बालपण==
रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५५ रोजी [[दिल्ली]] येथे झाला. (की २८ ऑगस्ट १९४८, पुणे?). वडिलांचे नाव अनंत मोरेश्वर ओक तर आईचे नाव निर्मला. त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत, अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या.
 
==शिक्षण==
रोहिणी ओक १९७०मध्ये बी.एस्‌सी. झाल्या आणि १९७१मध्ये त्यांचीनिवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा(NSD) या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी झाली. तीन वर्षाच्या त्या काळात रोहिणी ओकांनी विविध भाषांमधील नाटकांतून कामे केली. प्रेमचंदांच्या 'गोदान' वर आधारित 'होरी' नाटकातील 'धनिया' ची भूमिका, 'इबारगी' या जपानी 'काबुकी' पद्धतीच्या नाटकातील मावशीची भूमिका, कर्नाटकातील यक्षगान शैलीतील 'भीष्मविजय'मधील 'अंबे'ची भूमिका 'अंधा युग'मधील 'गांधारी'ची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून 'एका म्हाताऱ्याचा खून' या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. एन. एस. डी. चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुणे येथे आल्या.
 
==कारकीर्द==
==वैयक्तिक जीवन==
रोहिणी ओक या २८ मे १९७७ रोजी जयदेव हट्टंगडी यांच्याशी विवाहबद्ध होऊन '''रोहिणी हट्टंगडी''' झाल्या. जयदेव हट्ट्ण्गडी हे दिल्लीच्या एन.एस.डी.मध्ये दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेत होते.
 
==कारकीर्द==
 
रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या चित्रपटांत सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकांतूनही त्या दिसतात.
 
हट्टंगडी दाम्पत्याने 'कलाश्रय' ही नाटयाभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केलेली आहे. त्या
संस्थेमध्ये त्यांनी 'वाडा भवानी आईचा', 'अपराजिता' (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्टयपूर्ण भूमिका केल्या
आहेत.
 
==रोहिणी हट्टंगडी यांची नाटके==
 
* अमे जीविये बेफाम (गुजराथी)
* कस्तुरीमृग (पहिले व्यावसायिक नाटक)
* कळी एकदा फुलली होती
* खंडोबाचं लगीन
* जुगलबंदी (गुजराथी)
* डंख
* माणस होवानो माने डंख (गुजराथी)
* मित्राची गोष्ट
* रथचक्र
* लपंडाव
* लफडा सदन
* लोहमत (गुजराथी)
* सर्पनाद (गुजराथी)
 
==चित्रपट==
 
* अग्निपथ (हिंदी)
* अजीब दास्तान (हिंदी)
* अच्छुवेतान्ते वीड्डु (कानडी)
* अर्थ (हिंदी)
* चक्र (हिंदी)
* मन वरालु (तेलुगू)
* माने (कानडी)
* मुन्नाभाई एम. बी. बी. एस (तामीळ )
* सारांश (हिंदी)
* सीतारामय्या (तेलुगू)
 
== पुरस्कार ==
* बेस्ट ऑल राउंड स्टुडंट पुरस्कार
* NSDचा बेस्ट ॲक्ट्रेस ॲवॉर्ड
* महाराष्ट्र राज्य नाटयस्पर्धेत 'चांगुणा' या फेडरिको ग्रासिया लार्का यांच्या स्पॅनिश नाटकाच्या मराठी रूपांतरित नाटकात
'चांगुणा' ह्या मध्यवर्ती भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७५)
* २००९ 'बालगंधर्व पुरस्कार'<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4151919.cms रोहिणी हट्टंगडी, भरत जाधव यांना 'बालगंधर्व पुरस्कार]</ref>
* रोहिणीताईंना चार वेळा राज्य नाटय स्पर्धेत रौप्यपदके, प्रमाणपत्रे असे अभिनयाचे पुरस्कार
*'कस्तुरीमृग' या व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
* संगीत नाटक अकादमी ॲवॉर्ड '
* पाटी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार
* 'अर्थ' आणि 'अग्निपथ' या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार वगैरे.
* ब्रिटिश ॲकॅडमी ऑफ फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन आर्ट्‌स (बी. ए. एफ. टी. ए.) तर्फे रिचर्ड ॲटनबरोनिर्मित 'गांधी'
या चित्रपटातील 'कस्तुरबा' यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात
आले आहे.
 
 
==बाह्य दुवे==
==संदर्भ==
== पुरस्कार ==
* २००९ 'बालगंधर्व पुरस्कार'<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4151919.cms रोहिणी हट्टंगडी, भरत जाधव यांना 'बालगंधर्व पुरस्कार]</ref>
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}