"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ ३७८:
* एक चावट संध्याकाळ (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली)(बोरीवली नाट्यगृहाची बंदी)(मुंबई महापालिकेचीही बंदी)
* संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर)(या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली.)
* कुलवधु नाटकात [[ज्योत्स्ना भोळे]] यांच्या पाचवारी साडी नेसण्यावरून वाद झाले होते.
* गणपतीबाप्पा मोरया (लेखक योगेश सोमण). याच नावाचे वेगळ्या लेखकाचे एक बालनाट्यही आहे, त्यावर आक्षेप नव्हता.
* गांधी विरुद्ध गांधी (लेखक अजित दळवी).गांधीच्या नावाचा तथाकथित दुरूपयोग. आक्षेप टिकला नाही.
* घाशीराम कोतवाल (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात केलेल्या नाना फडणिसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता.
* पती माझे छत्रपती (संजय पवार). ह्या नाटकाचे आता ’पती माझे छत्रीपती‘ या नावाने प्रयोग होतात.
* बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
* संगीत भातुकलीचा खेळ (लेखक धोंडो रामचंद्र करमरकर ) या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
* मी नथुराम गोडसे बोलतोय (लेखक प्रदीप दळवी).नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप.
* यदाकदाचित (संजय पवार). नाटकात देवदेवतांचे विकृत चित्रण आहे हा आक्षेप होता.
* योनीमनीच्या गुजगोष्टी (बोरीवलीच्या नाट्यगृहाची बंदी)(ठाणे महापालिकेचीही बंदी)
* संगीत राष्ट्रोद्धार (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या संहितेच्या प्रती गुप्तपणे वाटल्या गेल्या.)
* वस्त्रहरण (लेखक गंगाराम गवाणकर). महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून.
* विजयतोरणा (या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.)
* शँपेन आणि मारुती या नाटकाचे नाव बदलून ’माकडाच्या हाती शँपेन’ असे करावे लागले.
* शिवाजी अंडरगाउंड इन भीमनगर मोहल्ला(भीमनगर शब्दाबद्दल नांदेड पोलिसांचा आक्षेप)
* सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
* स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)
|