कुणबीधोबी किंवा परीट हा बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक आहे. एकूण [[बलुतेदार|बलुतेदारांमध्ये]] हा दुसऱ्या क्रमांकाच्या [[बलुतेदार|बलुतेदारांत]] गणला जातो. [[कुंभार]] व [[न्हावी]] हेही दुसऱ्या क्रमांकाचे अन्य [[बलुतेदार]]. परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे. घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम. विशेषत: कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या ववा सोयरसुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्तरी करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा(चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परीटाकडेपरटाकडे होती.