"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा |
|||
ओळ ३३:
== जीवन ==
गावदेवी, मुंबईत ८-११-१९१९ रोजी जन्मलेले पु ल. ऊर्फ भाई, पुण्याच्या [[फर्गसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयात]] आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली [[सुनीता देशपांडे|सुनीताबाईंशी]] विवाहबद्ध झाले.
मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.
पु.
==बालपण आणि शिक्षण==
पु.ल.देशपांडे यांचे वडील हे ’अडवाणी कागद कंपनी‘त दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही. अशा तत्त्वनिष्ठ आणि सज्जन घरात पु.ल. जन्मले.
पु.ल.देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत. मात्र ते अतोनात हुशार होते. सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे पैसे त्यांच्या नशिबात नसत. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. अशी भाषणे सात वर्षे चालली. त्यानंतर मात्र, वयाच्या बाराव्या वर्षापासून पु.ल.देशपांडे स्वत:ची भाषणे स्वत:च लिहायला लागले, इतकेच नव्हे तर इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.
आपल्या घरात पु.ल.देशपांडे यांना खूप वाचन करायला आणि रेडिओवर संगीत ऐकायला मिळाले. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली.बालगंधर्वांनी शाबासकी व भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. पु.ल.देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.
वडिलांच्या मृत्यूमुळे पु.ल.देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या ’माझिया माहेरा जा‘ या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातला अनमोल ठेवा आहे. ग.दि.माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या ’इंद्रायणी काठी‘ला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.
कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल., मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.
==लेखक-अभिनेते-नाटककार म्हणून कारकीर्दींची सुरुवात==
१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या ’पैजार‘ या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भट्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान ’सत्यकथा‘मधून पुलंनी लिहिलेल्या ’जिन आणि गंगाकुमारी‘ ह्या लघुकथेने रसिक वाचकांचे लक्ष वेधून घेतले, आणि पु.ल. लेखक झाले.
फर्ग्युसनमध्ये असताना पु.ल.देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या ’ललितकलाकुंज‘ व ’नाट्यनिकेतन‘ या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली, आणि पु. ल. नट झाले.
१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी ’तुका म्हणे आता‘ हे नाटक आणि ’बिचारे सौभद्र‘ हे प्रहसन लिहिले, आणि पु.ल. नाटककार झाले.
==चित्रपटसृष्टीत पदार्पण==
१९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे.
१९४७सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती. आता ते पार्श्वगायकही झाले होते. वंदे मातरम्मध्ये पुल त्यांच्या आणि सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्या करून पु.ल. चित्रपटअभिनेते झाले. पु.ल.देशपांडे यांचा ’देवबाप्पा’ चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय ठरला. ’नाच रे मोरा’ हे अवीट गोडीचे गाणे अजूनही मुलांचे आवडते गाणे आहे. ’पुढचं पाऊल‘ या चित्रपटात त्यांनी ’कृष्णा महारा‘ची भूमिका केली, आणि ते अभिनयसंपन्न नट म्हणून प्रसिद्धीस आले.
१९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले.
== उल्लेखनीय ==
|