"युरोपीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{वर्ग}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{वर्ग}}
पॅरीसजवळ जुई आँ जोझासमधील पुरातन शातोमध्ये दीप प्रज्वलन आणि गणेशपूजा करून '''सातव्या मराठी युरोपियन संमेलनाचेसंमेलना'''चे १८जुलै २००८ रोजी उद्‌घाटन झाले.
 
संमेलनाच्या सकाळच्या पहिल्या सत्रात जर्मनीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का गोखले, निषाद फाटक आणि अक्षय जोशी यांनी मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. सतरा परदेशी भाषा अस्खलित बोलणाऱ्या मुंबईच्या अमृता जोशीची मुलाखत सर्वांनाच चक्रावून टाकणारी होती.
ओळ ७:
 
त्यानंतर राजीव नाईक लिखित, संदेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि अमृता सुभाष आणि निखिल रत्नपारखी अभिनीत नाटकाच्या प्रयोगाने संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
 
==९वे मराठी युरोपीय साहित्य संमेलन==
 
भारताबाहेर राहणाऱ्या युरोपीय मराठी समुदायाला जोडणारे नववे युरोपीय मराठी साहित्य संमेलन, ६ ते ८ एप्रिल २०१२ दरम्यान इंग्लंडमधील कार्डिफ (वेल्स) येथे, पंचतारांकित व्हेल हॉटेलमध्ये झाले. डॉ. निनाद ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनासाठी खास उपस्थित असलेले श्री. सचिन पिळगावकर, सौ. सुप्रिया पिळगावकर यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्‌घाटन केले. सौ. सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
 
युरोपमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांना एकत्र आणणे आणि युरोपात वाढणाऱ्या नव्या पिढीला मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा सोहळा आयोजित केला होता. संमेलनात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम झाले.