"बालसाहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय. या वाङ्मयात, राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे असतात. असे वाङ्मय लिहिणारे जगात अनेक लेखक होऊन गेले. हॅन्स ख्रिश्चन ॲन्डरसन हा त्या लेखकांतला एक प्रख्यात लेखक. त्याने लिहिलेल्या परीकथांची जगातल्या सर्व भाषांत भाषांतरे झाली आहेत. लेविस कॅरोलचे ’ॲलिस इन्‌ वंडरलॅन्ड, मार्क ट्वेनचे ’टॉम सॉयर’ आणि ’ॲडव्हेन्चर्स ऑफ हकरबरी फिन’, फिलिपा पिअर्सचे ’मिडनाईट गार्डन’, इ. यांशिवाय थोड्या मोठ्या मुलांसाठी हार्डी बॉइज, नॅन्सी ड्‌ऱ्यू, हॅरी पॉटर वगैरे पुस्तके जगप्रसिद्ध आहेत.
 
मराठीतही बालसाहित्य लिहिणारे अनेक लेखक आहेत. बालसाहित्यात अगदी छोट्या बाळांसाठी बडबडगीते, वाचता येणाऱ्या लहान मुलांसाठी कविता, नीतिकथा, साहसकथा, अन्य गमतीदार कथा, प्रवासवर्णने, आणि कधीकधी छोट्या कादंबऱ्या असतात.