विशाल सह्याद्री (वृत्तपत्र)

स्वतंत्र मराठी भाषिक राज्यांसाठी झालेल्या लढ्यातून मुंबईत मराठा दैनिक निघाले. विशाल सह्याद्री हे वृत्तपत्र ३० मे १९५८ रोजी प्रसिद्ध झाले आहे. पत्राचे पहिले संपादक अनंतराव पाटील यांनी २३ वर्षे सातत्याने पत्राची धुरा वाहिली. काँग्रेस पक्षाचे अधिकृत मुखपत्र म्हणून नव्हे मात्र कॉग्रेस पक्षाचे बाजू घेणारे वृत्तपत्र म्हणून पुण्यात विशाल सह्याद्री सुरू करण्यात आले.

इतिहास संपादन

पुण्यात त्यावेळी १९५७ साली सकाळ व प्रभात ही दोन मराठी दैनिके होती प्रभातचे तोरण संयुक्त महाराष्ट्र समितीला अनुकूल होते पण ते पत्रफार प्रभावी नव्हते सकाळ पत्राचा भाषावार प्रांत रचनेला विरोध होता.

पहिला अंक संपादन

हे पत्र एका स्वतंत्र ट्रस्टतर्फे चालविण्यात यावे व त्यावर ट्रस्टची नियंत्रण राहावे असे प्रथमपासूनच ठरविण्यात आले व त्यानुसार विशाल सह्याद्री ट्रस्टची स्थापना करण्यात येऊन पत्र सुरू करण्यात आले. पत्राचा पहिला अंक शुक्रवार दिनांक ३० मे १९५८ रोजी प्रसिद्ध झाला.

पहिले संपादक मंडळ संपादन

पत्राचे पहिले संपादक अनंतराव पाटील यांनी २३ वर्षे सातत्याने पत्राची धुरा वाहिली. काँग्रेस पक्षाचे अधिकृत मुखपत्र म्हणून नव्हे मात्र कॉग्रेस पक्षाचे बाजू घेणारे वृत्तपत्र म्हणून पुण्यात विशाल सह्याद्री सुरू करण्यात आले. नवे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी हे पत्र प्रामुख्याने होते. म्हणून पत्राची जबाबदारी पक्षाकडे ठेवण्यात आली नसावी पत्र काढण्यात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा पुढाकार होता. विशाल सह्याद्री दैनिकाचे प्रथम पासून संपादक असलेले अनंतराव पाटील यांनी निवृत्तीच्या वेळी म्हणजे एक जानेवारी १९८१ रोजी सर्वांचा ऋणी आहे या मथळ्याचा जो निरोपाचा अग्रलेख लिहिला त्यात त्यांनी याबाबत जो उल्लेख केला होता तो यशवंतराव चव्हाण यांची पत्र मागील प्रेरणा स्पष्ट करणारा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यशवंतराव चव्हाण यांनी बोलावून घेऊन सांगितले की एक नवे दैनिक सुरू करायचे आहे आणि त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारायची आहे. हे पत्र एका स्वतंत्र ट्रस्टतर्फे चालविण्यात यावे व त्यावर ट्रस्टची नियंत्रण राहावे असे प्रथमपासूनच ठरविण्यात आले व त्यानुसार विशाल सह्याद्री ट्रस्टची स्थापना करण्यात येऊन पत्र सुरू करण्यात आले.[१] संपादक अनंतराव पाटील यांनी कष्ट घेऊन संपादक पद दीर्घ काळ निष्ठेने सांभाळले १९४३ साली वृत्तपत्र व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली व सकाळ दैनिकात १४ वर्षे वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले अनुभवाच्या या शिदोरीवर त्यांनी नव्या देण्याची जबाबदारी स्वीकारली. अडचणींना तोंड देत त्यांना काम करावे लागले. पण संपादक म्हणून अनंतराव पाटील यांची छाप केव्हाच जाणवली नाही. अनंतराव पाटील १ जानेवारी १९८१ रोजी संपादक पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या जागी नाशिकच्या देशदूत दैनिकाचे संपादक असलेले शशिकांत टेंबे हे संपादक झाले. पण आठ दहा महिन्यातच पत्र आर्थिक कारणामुळे एक ऑक्टोबर १९८१ पासून बंद करण्यात आले राजकीय दृष्ट्याही पत्राचे महत्त्व संपुष्टात आले होते. यशवंतराव चव्हाण यांची राजकीय स्थान ढळल्याने पत्राची अवस्था आणखीनच कठीण झाली होती यामुळे ते बंद पडणे अपरिहार्य ठरले.

संदर्भ संपादन

मराठी वृत्तपत्राचा इतिहास – रा.के. लेले पान.नं. १०१५,१०१६,१०१७,१०१८

  1. ^ लेले, रा.के. (२००९). मराठी वृत्तपत्राचा इतिहास. कोन्तिनेन्ताल. pp. ११५-११८.