विवेक गोविलकर हे एक मराठी बिझिनेसमन आहेत. त्याशिवाय ते लेखकही आहेत. काॅर्पोरेट जगातील अनुभव हा त्यांच्या लेखनाचा प्रामुख्याने विषय असतो.

मुंबईच्या आयआयटीमधून धातुशास्त्र विषयात एम.टेक केल्यानंतर गोविलकर यांनी हाॅर्वर्ड बिझिनेस स्कूलमधून ह्यूमन रिसर्च मॅनेजमेन्टमधील एक एक्झिक्यडिव्ह अभ्यासक्रम केला.

विवेक गोविलकर यांनी टाटा युनिसिस (आता टाटा इन्फोटेक) कंपनीच्या लाॅस एंजेलिस, डेट्राॅईट, ब्रुसेल्स, न्यू जर्सी, आॅस्टिन, जमशेदपूर आदी ठिकाणच्या कार्यालयांमधून जानेवारी १९८२ ते मे १९९१ या काळात काम केले आहे. २०११ सालच्या डिसेंबरपासून ते बिझिनेस सल्लागार म्हणून काम करीत आले आहेत.

विवेक गोविलकर यांची पुस्तके

संपादन
  • The Takeover (इंग्रजी)
  • पाऊल वाजे (काॅर्पोरेट जगातील जीवनशैलीचे आणि ताणतणावांचे दर्शन घडवण्याऱ्या वेधक कथांचा संग्रह)
  • युनायटेड आयर्न अँड स्टील (कादंबरी)
  • हा ग्रंथसागरू येव्हडा
  • द बॉस इज ऑल्वेझ राइट