विलियम बॅफिन रेखांशाची गणना करणारा इंग्रज दर्यावर्दी
(१५८४-१६२२)

विलियम बॅफिन
जन्म साचा:जन्म दिनांक: १५८४
मृत्यू २३ जानेवारी १६२२
राष्ट्रीयत्व लंडन (इंग्लंड)
नागरिकत्व लंडन (इंग्लंड)
पेशा रेखांशाची गणना करणारा इंग्रज दर्यावर्दी
पदवी हुद्दा (विमान, जहाज, इ) चालवणारा

इतिहास संपादन

हा इंग्रज दर्यावर्दी रेखांशांची गणना करणारा पहिलाच दर्यावर्दी होय.
इ.स. १६१५ मध्ये चंद्राच्या निरीक्षणावरून त्याने रेखांश (पूर्व-पश्चिम स्थिती) मोजण्याची पद्धत शोधली. मात्र ही पद्धत खूपच गुंतागुंतीची असल्याने ती फारशी प्रचलित झाली नाही. युरोप मधून आशियाकडे वायव्य दिशेने कॅनडाच्या वरून जाणारा मार्ग शोधण्यासाठी त्याने १६१२,१६१५ व १६१६ मध्ये एकूण तीन मोहिमा केल्या. त्यात त्याने ग्रीनलंंन्डच्या किनारपट्टीचा शोध लावला. त्यांनी शोधलेल्या बेटाला आणि उपसागराला बॅफिन बेट व बॅफिन उपसागर असे नाव देण्यात आलं. वायव्य दिशेने आशियाकडे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

संदर्भ संपादन

कुलकर्णी, सुहास (जानेवारी २०१२). यांनी घडवलं सहस्त्रक. पुणे: रोहन प्रकाशन. pp. १९. ISBN ८१-८६१८४-९०-७ Check |isbn= value: invalid character (सहाय्य).

बाह्य दुवे संपादन