विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धती

विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धती (इंग्लिश: Fission track dating, फिजन ट्रॅक डेटिंग )
या पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने भूविज्ञानशास्त्र शाखेतील अवशेषांचे कालमापन करताना होतो. एक अब्ज वर्ष पूर्व इतक्या प्राचीन काळातील अवशेषांचे कालमापन या पद्धतीने करता येते. पुरातत्त्वीय अवशेषांच्या दृष्टीने पाहता या पद्धतीने प्रामुख्याने एक ते दहा लाख या मर्यादेतील अवशेषांचे कालमापन योग्य रितीने होऊ शकते.
प्रत्येक खनिजात व नैसर्गिक काचेत यूरेनिअम हा घटक थोड्याफार प्रमाणात का होईना असतोच. या यूरेनिअमचे आपोआप विघटन चालू असते. या विघटनाला फिजन डिके असे म्हणतात. या विघटनाच्या क्रियेमुळे सबल अणू तयार होऊन ते त्या वस्तूंवर संकुचित तेजोरेषा निर्माण करतात. वस्तू जितकी प्राचीन तितक्या तिच्यावरील तेजोरेषा अधिक. या रेषांचे मापन करून त्या वस्तूचा काळ ठरविता येतो.