डॉ. विनीता विजय महाजनी तथा शैला भालेराव (२४ ऑगस्ट, इ.स. १९४० - ) या एक मराठी लेखक व कवयित्री आहेत. त्यांनी काही जर्मन पुस्तकेही लिहिली आहेत. त्या एक रंगचित्रकार आहेत.

विनीता महाजन यांनी मराठी, इंग्रजी आणि जर्मन भाषांत मिळून एकूण १९हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

शिक्षणसंपादन करा

विनीता महाजनी यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. केले (१९६१) व नंतर पुणे विद्यापीठातून एम.ए. त्यानंतर जर्मन ॲकॅडेमिक एक्सचेंजच्या अन्वये स्कॉलरशिप मिळवून त्या जर्मनीला गेल्या. भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठातून ’जर्मन साहित्य’ या विषयावर जर्मन भाषेत प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली.

अध्यापनसंपादन करा

इतर कार्यक्षेत्रेसंपादन करा

विनीता महाजनी यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • कलश (कवितासंग्रह)
  • गंधवती (कवितासंग्रह)
  • Geistesverse Aus Indien Von Samarth Ramadas ('मनाचे श्लोक’चे जर्मन भाषांतर)
  • जर्मनीतील करवंदनगरी (कथा)
  • जैत्र (कवितासंग्रह)
  • Zum Formlosen Gott Durch Das Intonieren Des Gottesnamens (जर्मन, आध्यात्मिक)
  • ट्युलिप निशिगंधाकडे येते (कथासंग्रह)
  • Dialogue With Mind (इंग्रजी, आध्यात्मिक)
  • Deutsch In Indien (जर्मन)
  • दर्यापार (अनुभवकथन)
  • निवडुंगावर उमललं फूल (व्यक्तिचित्रण)
  • Power Of Words Leads To Wordless Power (इंग्रजी, आध्यात्मिक)
  • फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया (इंग्रजी)
  • Flavour of Nature (इंग्रजी)
  • मृगनयनी मनस्विनी ऑड्री हेपबर्न (अनुवादित, मूळ पुस्तक मून रिव्हर : ऑड्री हेपबर्न, मूळ इंग्रजी लेखक - शॉन हेपबर्न)
  • रंगपंखी (कवितासंग्रह)
  • Lebenswege Von Samartha Ramdas (जर्मन)
  • शतपाकळ्या (कवितासंग्रह)
  • श्याम-झूल (कवितासंग्रह)
  • Stories of Ramdas (इंग्रजी; सहलेखक - सुनील चिंचोलकर)
  • (विल्यम बुशची) हसरी पानं (अनुवादित कथा)