विनायक धुंडिराज बापट

विनायक धुंडिराज बापट हे पुण्याच्या न.का. घारपुरे प्रशालेत (तत्कालीन नाव - पूना इंग्लिश स्कूल, नंतरचे नाव सरस्वती मंदिर शाळा) व नंतर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक संस्थेत अध्यापक होते. त्यांनी खेळाच्या मानसशास्त्रावर संशोधन केले.

पूना इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून कबड्डी आणि खोखो या खेळांतील शारीरिक क्षमतेच्या भावनांच्या आणि अंदाजाच्या अभ्यासपद्धत या विषयावर पी.एचडी.ची पदवी घेतली. भारतीय खेळाबाबत शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला हा त्या काळातला पहिलाच प्रबंध होता.[ संदर्भ हवा ] टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये त्यांनी पहिल्यांदा संगणकाचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठी केला[ संदर्भ हवा ].(संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स १७-२-१९१७)

पुणे विद्यापीठात या अभ्यासशाखेतील ते पहिले मार्गदर्शक होते. त्यांनी १९६७ नंतर येथे नोकरी केली.