विद्युत अभियांत्रिकी


विद्युत अभियांत्रिकी ही अभियांत्रिकी शिक्षणाची एक शाखा आहे जी सर्वसाधारणपणे विद्युत व विद्युत-चुंबकत्वाचा अभ्यास व त्यांचे उपयोग यांच्याशी निगडीत आहे. १९व्या शतकाच्या उत्तार्धात तारायंत्र, दुरध्वनी आणि विद्युत शक्ति वितरण व वापर यांच्या वाणिज्यीकरणानंतर प्रथमच ही शाखा व्यवसायिक म्हणुन अभिन्न मानली जाउ लागली. त्यानंतर, प्रसारण आणि नोंदणी माध्यमांमुळे इलेक्ट्रॉनिक्स दैनंदिन जिवनाचाच भाग बनले. ट्रान्झिस्टर आणि त्यामागोमाग एकात्मिक परिपथाच्या शोधामुळे इलेक्ट्रॉनिक्स इतके स्वस्त झाले, की त्याचा उपयोग जवळपास सर्वच घरगुती उपकरणांमध्ये करता येण्याजोगा झाला. वैयक्तिक संगणक आणि माहिती तंत्रज्ञान यांना आतापर्यंत वापरात असलेले सर्वात जटिल इलेक्ट्रॉनिक्स म्हणता येईल.

विद्युत अभियंते जटील उर्जा प्रणाली विकसित करतात...
...व इलेक्ट्रॉनिक सर्किटस् पण

आजकाल या शाखेमध्ये अनेक उपशाखांचा समावेश केला जाउ लागला आहे, जसे अंकीय संगणक, शक्ति अभियांत्रिकी, दुरसंचार, नियंत्रण प्रणाली, संकेत प्रक्रिया ई.

विद्युत अभियंते सामान्यत: विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची पदवी धारण करतात.