विजय साईनाथ औताडे ४ फेब्रुवारी १९८८ औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष (ग्रामीण, भारतीय जनता पार्टी, औरंगाबाद)

श्री. विजय साईनाथ औताडे

जिल्हाध्यक्ष (ग्रामीण, भारतीय जनता पार्टी, औरंगाबाद)
विद्यमान
पदग्रहण
२०२०

उपमहापौर, औरंगाबाद
कार्यकाळ
२९ सप्टेंबर २०१७ – २०१९

जन्म ४ फेब्रुवारी १९८८
हर्सूल
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास "इंद्रप्रस्थ" प्लॉट नंबर 17, साई साफल्य नगर, हर्सूल टी पॉइंट, जळगाव रोड, मयुर पार्क,औरंगाबाद
धर्म हिंदू
संकेतस्थळ www.vijayautade.com
विजय साईनाथ औताडे म्हणजे अत्यंत धडाडीचे नेतृत्व. औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक आणि तळमळीने कार्य करीत असून स्थानिक रस्ते, वीज, पाणी, कचरा यासारख्या मूलभूत समस्यांसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. एक उत्कृष्ट नेतृत्व आणि युवा संघटक म्हणून ते पुढे येत आहेत.

व्यक्तिगत जीवन

संपादन

दिनांक ४ फेब्रुवारी इ.स. १९८८ रोजी जन्म हर्सूल, औरंगाबाद येथील एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. स्थानिक मनपा शाळेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याकडे त्यांचा सहभाग असे. विद्यार्थ्यांचा मागासलेपणा, त्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी, फिस भरण्यामध्ये येणाऱ्या अडचणी यासाठी वारंवार आंदोलने केली. २००५ मध्ये विद्यार्थी चळवळीसाठी त्यांनी मोठे कार्य केले.

महाविद्यालयानंतर राजकारणात प्रवेश करून सामाजिक विकास कार्यात आपला सहभाग ते नोंदवू लागले. 2015 साली भारतीय जनता पार्टी मधून सर्वाधिक मतांनी विजयी नगरसेवक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. स्थानिक विकास कामांची त्यांना यथार्थाने जाण आहे. स्थानिक युवकांना संघटित करण्यासाठी ते सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात. समाजातील असंख्य युवकांना हाती धरून त्यांनी जनहिताची अनेक कामे पार पाडली असून सध्या औरंगाबाद महानगरपालिकेतील विद्यमान उपमहापौर आहेत तसेच औरंगाबाद महानगरपालिकामध्ये ते आरोग्य सभापती व भारतीय जनता युवा मोर्चा, संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षही आहेत.

शैक्षणिक पात्रता

संपादन
  • पदवी परीक्षा उत्तीर्ण ( 2008 )

राजकीय टप्पे

संपादन
  • २००८ - राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रवेश
  • २०१२ - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
  • २०१४ - लोकसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रचार प्रमुख म्हणून कार्य
  • २ फेब्रुवारी २०१५ - भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश
  • २५ एप्रिल २०१५ - शहरातील सर्वात जास्त मतांनी नगरसेवक म्हणून निवड
  • २० मे २०१५ - आरोग्य सभापती
  • ९ जून २०१६ - जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा
  • जिल्हा मतदार नोंदणी संयोजक (२०१८-२०१९) भारतीय जनता पार्टी, औरंगाबाद
  • २९ सप्टेंबर २०१७ - २०१९ : महानगरपालिका औरंगाबादच्या उपमहापौर पदावर कार्य करण्याची संधी
  • २०२० - जिल्हाध्यक्ष (ग्रामीण, भारतीय जनता पार्टी, संभाजीनगर)

इतर सामाजिक क्षेत्रातील भूमिका

संपादन

संचालक - VACK बिल्डर्स व डेव्हलपर्स (बांधकाम व्यवसाय)

संस्थापक अध्यक्ष - अंबिका ग्रुप

संस्थापक अध्यक्ष - हरसिद्धि गणेश मंडळ

संस्थापक अध्यक्ष - विजयपथ प्रतिष्ठान

व्यक्तिगत गुणविशेष

संपादन

भेदक नजर, रुबाबदार, धाडसी, खंबीर आणि मातीशी अत्यंत निगडित असणारे विजय औताडे औरंगाबाद येथील युवकांचे आवडते नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. आपण करीत असलेल्या सामाजिक आणि राजकीय साकारातमक कार्यात एकटे पुढे न जात सर्वांना घेऊन पुढे जाणे हा त्यांचा गुण. राजकीय कार्य करीत असतानाच समाजातील अनाथ आणि गरीब लहान मुलींसाठी माणुसकीच्या नात्याने मोठे कार्य त्यांनी उभे केले आहे.

सामाजिक कार्य

संपादन

हरसिद्धि गणेश मंडळ - गेल्या जवळपास बारा वर्षांपासून हरसिद्धी गणेश मंडळातून प्रतिवर्षी गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवाचे १० दिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्येष्ठांसाठी विविध शिबिरे, मोफत आरोग्य शिबिर, मोफत सेतू सुविधा, माता भगिनी साठी मनोरंजनाचे कार्यक्रम, महालक्ष्मी सजावट, होम मिनिस्टर सारखा मनोरंजक कार्यक्रम, युवकांसाठी निसर्ग सहलींचे आयोजन यामध्ये केले जाते.

विजयपथ प्रतिष्ठान - विजयपथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो युवकांना संघटित करण्यासाठी ते कार्य करीत आहेत. सामाजिक आणि जनहिताच्या कार्याबरोबरच गणेशोत्सवात १०१ युवक आणि युवतीचे ढोल पथक त्यांनी निर्माण केले आहे. संघटनातून समाजातील युवकांनी युवतींचा सर्वांगीण विकास हा त्यांचा प्रधान हेतू आहे.

मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ विशेष कार्य - आपल्या मातोश्री कै. अनिताताई साईनाथ औताडे यांच्या पुण्यस्मरणार्थ गेल्या १७ वर्षांपासून अनाथ मुलींचे पालकत्व ते स्वीकारत आहेत. आजपर्यंत १७ मुलींचे पालकत्व त्यांनी स्वीकारले असून. गौरी या अनाथ कन्येचा विवाह देखील त्यांनी करून दिला. या निस्वार्थ कार्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.