विजय लोणकर हे मराठीतील एक पत्रकार, लेखक, अनुवादक व कवी आहेत. व्यवसायाने स्थापत्य अभियंता असलेल्या विजय लोणकर यांची ११ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

<Vijay1>

शिक्षण

संपादन

विजय लोणकर हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी राज्यशास्त्र या विषयात एम.ए.केले आहे. पत्रकारितेमधील पदविका त्यांनी प्राप्त केली आहे.

पत्रकारिता

संपादन

पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'दै.केसरी' या वृत्तपत्रात विजय लोणकर १९ वर्षे होते. 'क्रीडा पत्रकार' म्हणून काम करताना त्यांनी विश्वचषक क्रिकेट, डेव्हिस चषक टेनिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन केले आहे. याशिवाय अनेक कसोटी सामने व एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचे वार्तांकन केले आहे.

लोणकरांनी क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने त्यांनी आतापर्यंत अनेक नामवंत क्रिकेटपटूच्या व टेनिसपटूच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डेव्हिड गावर (इंग्लंड), कोर्टनी वाल्श (वेस्ट इंडीज), रवी शास्त्री, इरापल्ली प्रसन्ना, अजित वाडेकर, किरण मोरे (भारत) यांचा समावेश आहे. रमेश कृष्णन, रामनाथ कृष्णन, लिएण्डर पेस, नरेशकुमार या टेनिसपटूच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती गाजल्या होत्या.

विजय लोणकर हे 'दै.केसरी'मध्ये सलग ६ वर्ष 'छू-मंतर' हे सदर लिहीत होते. या सदरातील निवडक लेखांचे 'छू-मंतर'हे पुस्तक २००३मध्ये प्रसिद्ध झाले.

'दै.पुढारी' या वृत्तपत्रामध्ये लोणकर यांचे 'लोणकढी' हे सदर दररोज एक वर्ष येत होते. या सदरातील निवडक लेखांचा संग्रह 'लोणकढी' याच नावाने सन २०११मध्ये प्रसिद्ध झाला.

साहित्य संपदा

संपादन
  • आसामचा शिवाजी (अनुवाद)
  • एका मुहाजिराची संघर्षगाथा (अनुवाद)
  • छू-मंतर (उपहासात्मक लेखांचा संग्रह)
  • परदेशात शिकायचंय (सहलेखक- .अरविंद व्यं.गोखले)
  • पाकिस्तानात साठ वर्षे (अनुवाद-सहअनुवादक- .अरविंद व्यं.गोखले)
  • माझा पाकिस्तान (अनुवाद)
  • रेशीमसरी (काव्यसंग्रह)
  • लोणकढी (उपहासात्मक लेखांचा संग्रह)
  • विश्वचषक (क्रिकेट)
  • सीमेवरील सावल्या (अनुवाद)
  • किवियो:सफर न्यू झीलंडची (प्रवासानुभव)