विजय कृष्णाजी कारेकर

प्रा. विजय कृष्णाजी कारेकर (२७ नोव्हेंबर, १९४०: कोल्हापूर - ८ एप्रिल २०२२, पुणे) हे मराठी लेखक, नाटककार, कवी आणि चित्रकार होते. ते पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय, येथील माजी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख होते. प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे हे कारेकर यांचे ज्येष्ठ प्राध्यापक सहकारी होते. प्रा. कारेकर हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला आणि सामाजिक विज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता होते. दिल्ली दूरदर्शनवर त्यांची तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञान आणि जीवन चरित्रे या विषयावर व्याख्याने झाली आहेत. ते युनिक फीचर्स आणि प्रकाशन, पुणे,च्या 'अनुभव' मासिकाचे एक लेखक होते.

प्रा. विजय कृष्णाजी कारेकर

‘अनुभव’ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या एका कथेवर ‘गेटवे ऑफ हेवन’ हा लघुचित्रपट निघाला. त्यास संहिता लेखनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. सेवादलात प्रा. कारेकर यांनी काही वर्षे काम केले. श्री. यदुनाथ थत्ते यांच्याबरोबर ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादन कामात सहभाग घेतला.[ संदर्भ हवा ]

विजय कारेकर यांचे ०८ एप्रिल २०२२ रोजी पुणे येथे निधन झाले.[]

कौटुंबिक माहिती

संपादन
 
प्रा. विजय कारेकर, पत्नी सौ. विनता कारेकर यांच्याबरोबर २०१५

प्रा. कारेकर यांचे वडील कृष्णाजी कारेकर यांची कोल्हापूर येथे सराफी पेढी होती. कृष्णाजी कारेकर हे उत्तम रत्‍नपारखी आणि हस्तिदंती मूर्तिकार होते. त्यांना तत्कालीन संस्थानिक मंडळीचे नेहमी आमंत्रण असे. प्रा. कारेकर यांच्या पत्‍नी विनता या जुने नाटककार आणि पुणे आकाशवाणीचे लेखक-कलाकार विनायक देवरुखकर यांच्या कन्या आहेत. त्या १९८१ साली पुण्याच्या एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयातून बी.ए. झाल्या. भरत नाट्य संशोधन मंदिर येथे त्या नाट्य कलाकार होत्या. प्रा. कारेकर यांना दोन मुलगे आहेत. पहिला मिनाल हा लघुचित्रपट निर्माता होता, त्याचे कोरोनाने अकाली निधन झाले. दुसरा मुलगा आशिष हा चित्रकार आहे. [ संदर्भ हवा ]

विजय कारेकर यांचे शिक्षण

संपादन
  1. १९५८ : जुनी अकरावी, न्यू हायस्कूल, कोल्हापूर
  2. १९६६ : बी.ए. तत्त्वज्ञान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
  3. १९६८ : एम.ए. तत्त्वज्ञान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे[ संदर्भ हवा ]

अध्यापकीय कारकीर्द

संपादन
  • १९६८ – ६९ : इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात अध्यापक
  • १९६९ – ७० : कऱ्हाड येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात अध्यापक
  • १९७० : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात अधिव्याख्याता
  • १९९० : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक
  • १९९३-९४ पासून : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान विभागप्रमुख
  • २००० : निवृत्त

कारेकर यांनी तीन नाटके, पंचवीस एकांकिका, काही कथा आणि कविता लिहिल्या. पंचवीसपैकी दहा एकांकिका पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सादर झाल्या. दोन नाटकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या काही कवितांचे इंग्लिशमध्ये अनुवाद झाले आहेत. हे अनुवाद दिल्लीच्या साहित्य अकादमीइंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनशिप, यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आले आहेत.[ संदर्भ हवा ]

संपादन व प्रकाशन

संपादन

नाटके

संपादन
  1. छळछावणी
  2. स्वगत

एकांकिका

संपादन
  1. ॲबसर्ड प्रियकर
  2. उंदीरराव आणि नटी
  3. पुरुषराव
  4. दरवेश

कविता

संपादन

१९७०: सूर्यमुक्त (कविता संग्रह), शब्दश्री प्रकाशन, प्रकाशक – अनिल किणीकर, पुणे

पुरस्कार

संपादन

गेटवे ऑफ हेवन

संपादन
  • प्रथम पुरस्कार २००९-१० : संहिता लेखन : ‘गेटवे ऑफ हेवन’, लघुचित्रपट, पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, पुणे.[ संदर्भ हवा ]

छळछावणी

संपादन
  • क्रमांक दुसरा,२०१३ : कामगार कल्याण मंडळ, पुणे
  • लेखन : प्रथम, कमांक दुसरा नाटकः सादरीकरण, आणि प्रयोग २००४ , महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, पुणे विभाग

स्वगत

संपादन
  • पहिला पुरस्कार २०१४ : नाट्य लेखन, अभिरुची संस्था, स्थापना :४-६-१९८१,

[]

सामाजिक सहभाग

संपादन
  • २०१२ : सदस्य, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (पुणे)
  • १९९५ : सायंकालीन तत्त्वज्ञान वर्गाची स्थापना, सर परशुरामभाऊ महाविद्यालय (पुणे)
  • १९९५ : प्राचार्य सोनोपंत दांडेकर अध्यासन स्थापनेत सहभाग, सर परशुरामभाऊ महाविद्यालय (पुणे)
  • १९८२-२००० : सचिव, वसंत व्याख्यानमाला (वक्तृत्वोतेजक सभा, पुणे)

भूषविलेली पदे

संपादन
  • व्याख्याता सर परशुराभाऊ महाविद्यालय,पुणे.
  • २००६–१४ : अधिष्ठाता, कला आणि सामाजिक विज्ञान विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
  • १९९१-२००० : सचिव, पूना फिलॉसॉफिकल युनियन, पुणे

हेही वाचा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Loksatta loksatta pune epaper dated Sat, 9 Apr 22". epaper.loksatta.com. 2022-04-22 रोजी पाहिले.
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/-/articleshow/20139092.cms[permanent dead link]?, १४ सप्टेंबर २०१५ रोजी दुवा पहिला.