विजय कर्णिक हे भारतीय वायुसेनेत विंगकमांडर होते. १९७१ मधील भारत पाकिस्तान मधील युद्धकाळात ते भुज विमानतळावर कार्यकारी अधिकारी होते.[]

विजय कर्णिक

पूर्व भारतीय वायुसेना अधिकारी
कार्यकाळ
२६ मे १९६२ - १४ ऑक्टोंबर १९८६

जन्म ६ नोव्हेंबर १९३९
नागपूर, महाराष्ट्र
आई ताराबाई कर्णिक
वडील श्रीनिवास कर्णिक
पत्नी उषा कर्णिक
अपत्ये शलाका कर्णिक (पुत्री)

पारेश कर्णिक (पुत्र)

धर्म हिंदू

जीवनचरित्र

संपादन

विजय कर्णिक यांचा जन्म नागपूर येथे झाला होता. त्यांनी शालेय शिक्षण नागपुरात घेतले, ते सायन्सचे स्नातक आहेत. त्यांच्या आईचे नाव ताराबाई कर्णिक आणि बाबांचे नाव श्रीनिवास कर्णिक होत. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांना एक बहीण आणि तीन भाऊ आहेत वासंती , विनोद (मेजर जनरल) , लक्ष्मण(विंग कमांडर) आणि अजय कर्णिक (एर मार्शल). विजय कर्णिक यांच्या पत्नीचे नाव उषा कर्णिक आहे. त्यांना एक मुलगी आहे शलाका कर्णिक आणि मुलगा परेश कर्णिक[]

वायुसेना कारकीर्द

संपादन

१९७१ मध्ये भारत पाकिस्तान युद्ध काळात विजय कर्णिक हे स्क्वाड्रन लीडर होते व कच्छ-गुजराथमधील भुज विमानतळावर काम करत होते. तेथे त्यांनी पाकिस्तानी बॉम्बिंगमुळे खराब झालेली धावपट्टी स्थानिक महिलांच्या मदतीने दुरुस्त केली होती. या दुरुस्तीमुळे, भारतीय वायुसेनेची विमाने तेथे उतरू शकली.[]

सिनेमामध्ये

संपादन
  • 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया (२०२०) या चित्रपटात अजय देवगण यांनी विजय कर्णिक यांची भूमिका केली आहे.या चित्रपटात कशाप्रकारे स्क्वड्रन लीडर विजय कर्णिक यांनी १९७१ मधील भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भुज विमानतळावरील धावपट्टी दुरुस्त केली हे दर्शवले आहे. या कामात त्यांना भुज येथील गावांतील ३०० महिलांनी मदत केली होती.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/
  2. ^ https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/
  3. ^ रघुवंशी, आकांक्षा (०२ जानेवारी २०२०). "भुज : द प्राइड ऑफ इंडियाच पहिला लुक अजय देवगण या चित्रपटात विजय कर्णिकयांच्या रुपात उत्तम लागतं आहेत". एनडीटीव्ही. ०४ जुलै २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ https://www-ndtv-com.cdn.ampproject.org/v/s/www.ndtv.com/entertainment/bhuj-the-pride-of-india-first-look-ajay-devgn-as-air-force-officer-vijay-karnik-is-impressive-2157878?amp_js_v=a3&amp_gsa=1&amp=1&akamai-rum=off&usqp=mq331AQFKAGwASA%3D#aoh=15938616204925&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&amp_tf=From%20%251%24s&ampshare=https%3A%2F%2Fwww.ndtv.com%2Fentertainment%2Fbhuj-the-pride-of-india-first-look-ajay-devgn-as-air-force-officer-vijay-karnik-is-impressive-2157878