विजयवाडामधील पर्यटनस्थळे

विजयवाडा हे आंध्रप्रदेश मधील कृष्णा जिल्ह्यात, कृष्णा नदीच्या काठावर वसलेले व्यापारी शहर आहे.

  • प्रकाशम बॅरेज: कृष्ण नदीवरील मूळ धरण १०० वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. सध्या असलेले धरण १९५०मध्ये बनविण्यात आलेले आहे. ते १,२२३.५ मी (४,०१४ फुट) लांब आहे. विजयवाडामधील बरेच कालवे या बॅरेज मागील भागात असलेल्या तळ्यात येऊन मिळतात. []
  • उंडावल्ली गुहा : या गुहा विजयवाडा पासून ५ किलोमीटरवर गुंटूर जिल्ह्यात आहे. या गुहा ख्रिस्तोत्तर ७व्या शतकात बनविल्याचे बोलले जाते. पावसाळ्यात बौद्ध भिक्षु या २ मजली इमारतींचा आश्रयस्थान म्हणून वापर करत असत. गौतम बुद्धांची विश्राम स्थितीतील शिल्प लक्षवेधी आहे.
  • कृष्णावेणी मंडपम : याला नदी जवळचे म्युझियम असेही म्हणले जाते आणि ते प्रकाशम बॅरेजच्या बाजूला आहे. ह्याची निर्मिती कृष्णा औद्योगिक आणि कृषी प्रदर्शन संस्थेने केली असून त्यामध्ये कृष्णेच्या प्रवाहाची भौगोलिक स्थिती, जागतिक चलनी नोटा आणि नाणी, कृष्णम्माची मूर्ती इ. गोष्टी आहेत.
  • राजीव गांधी उद्यान : हे उद्यान विजयवाडा पालिकेने बनविलेले आहे. शहरात प्रवेश करतांनाच असलेले हे उद्यान आपल्या बागांनी पर्यटकांचे स्वागत करते. त्यामध्ये एक छोटे प्राणीसंग्रहालय तसेच संगीत कारंजे आहेत. हे उद्यान दुपारी २ वाजेपासून ८ वाजेपर्यंत उघडे असते.
  • गांधी टेकडी : ७ स्तूपे असलेली देशातले पहिले गांधी स्मृतीस्थळ ज्याची उंची ५०० फुट (१५० मी.) आहे, या टेकडीवर बांधले गेले. हे ५२ फुट (१६ मी.) उंची असलेले स्तुपांचे उद्घाटन १९६८मध्ये भारताचे राष्ट्रपती डॉ.झाकीर हुसेन यांनी केले. गांधी स्मृती वाचनालय, महात्मा गांधींच्या आयुष्यावरील ध्वनिचित्रफिती आणि तारांगण ही इथली काही प्रमुख आकर्षणे आहेत.
  • विक्टोरिया जुबली म्युझियम : पुरातत्त्वशास्त्र प्रेमींसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. ह्या म्युझियममध्ये अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवलेले प्राचीन शिल्पाकृती, चित्रे, मूर्ती, शस्त्रे, कटलरी आणि शिलालेख आहेत. सध्या हे म्युझियम दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.[]
  • भवानी बेट : बहुदा नदीमध्ये असलेल्या मोठ्या बेटांपैकी एक हे बेट असेल. भवानी बेट कृष्णा नदीमध्ये शहराजवळ आहे. आंध्रप्रदेश पर्यटन मंत्रालय ह्या १३३ एकर (५४ हेक्टर) बेटाला एका आकर्षक पर्यटन स्थळामध्ये रूपांतरीत करत आहे. तसेच एक नदीकाठी एक रेसोर्ट निर्माण करत आहे. []
  • मोगलराजापुरम गुहा : या गुहा ख्रिस्तोत्तर ५ व्या शतकात निर्माण केल्याचे मानले जाते. तश्या प्रकारच्या दक्षिण भारतातील त्या पहिल्याच असल्याचे प्रसिद्ध आहे. भगवान नटराज, विनायक आणि अर्धनारीस्वरा यांच्या मूर्ती येथे कोरलेल्या आहेत परंतु कुठल्याही प्रकारचे शिल्प येथे नाहीये.

धार्मिक पर्यटनस्थळे

संपादन
  • कनक दुर्गा मंदिर : विजयवाडा आणि परीसरामधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक कनक दुर्गा मंदिर, इंद्रकिलाद्री टेकडीवर आहे जेथून शहर आणि कृष्णा नदीचे विहंगम दृश्य बघावयास मिळते.[] तेथे घाट मार्गाने वाहनाने किंवा पायऱ्यांनी चढूनही जाता येते. मंदिरात विविध राजघराण्यांचे शिलालेख बघावयास मिळतात. विजयादशमीला कृष्णा नदीत पवित्र स्नान करून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.
  • मारकाता राजराजेश्वरी मंदिर : दगडांपासून बनविलेले हे एक विशिष्ट्य प्रकारचे देवीचे मंदिर आहे. गुंतागुंतीच्या वास्तुकलेतून बनविलेले श्रीचक्र (देवी मातेचे निवासस्थान) या ठिकाणी बघावयास मिळते.[]
  • सुब्रमण्यम स्वामी मंदिर : विजयवाडातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक, इंद्रकिलाद्री टेकडीवर असून संपूर्ण शहर तसेच कृष्णा नदी बघता येते. पायऱ्यांवरून चढून जाता येते. स्कंद षष्टी सणाच्या वेळी शहरातील हजारो भाविक येथे येतात. तामिळनाडू मधून अनेक भाविक नेहमी येत असतात. या मंदिराची व्यवस्था इद्दीपिल्ली परिवार बघतो.
  • मंगलगिरी : गुंटूर जिल्ह्यात विजयवाडापासून १२ कि.मी. वर डोंगराळ मंगलगिरी भागात असलेले नरसिंहाचे प्रसिद्ध मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली मूर्ती भाविकांनी आणलेल्या पनाकम (गुळ मिसळेले पाणी) मधील अर्ध्या प्रमाणात स्वीकार करते, भांड्याचा आकार कितीही असला तरी.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Tourism in Vijayawada". 2014-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-31 रोजी पाहिले.
  2. ^ "Vijayawada Tourism, Vijayawada Travel Guide".
  3. ^ "Tourism in Vijayawada". 2014-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Kanakadurga Temple on Indrakeeladri hill". 2017-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-31 रोजी पाहिले.
  5. ^ "Marakata Rajarajeswari Temple".