विचारशलाका
विचारशलाका हे लातूर लातुरहुन प्रकाशित होणारे त्रैमासिक आहे. याचे संस्थापक, संपादक डॉ. नागोराव कुंभार हे आहेत. या नियतकालिकाची सुरुवात इ.स. जुलै १९८७ला झाली. सामाजिक शास्त्र संशोधन व समाज विकास प्रतिष्ठान, लातूरचे मुखपत्र म्हणुन ‘विचारशलाका’ प्रकाशित होऊ लागले ते आज तागायत.
उद्देश
संपादनसामाजिक शास्त्र संशोधन व समाज विकास प्रतिष्ठान, लातूर यांच्या भूमिका सांभाळत स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचे काम 'विचारशलाका' या नियतकालिकाने केले आहे. समाज प्रबोधनाच्या आणि नवविचार आणि नवमूल्यांच्या अभिसरणाच्या प्रेरणेने सातत्य व गुणवत्ता सांभाळून काम केले. विचारसंघर्ष आणि विचारकलह यातून वैचारिक जागृती होते हे तत्त्व स्वीकारून त्यांनी 'विचारशलाका' मध्ये सर्व प्रागतिक आणि पुरोगामी विचारांना आदराचे स्थान दिले. आपल्या समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सांस्कृतिक सत्तेपासून शतकानुशतके वंचित असलेल्या समूहांच्या समस्यांची चिकित्सा करावी, राष्ट्रीय आणि सामाजिक चळवळी व कार्यकर्त्यांना वैचारिक आधार व दृष्टि द्यावी, सामाजिक शास्त्रांतील मूलभूत संकल्पना व सिद्धांतांची मिमांसा करावी आणि वैचारिक साहित्य वाचणारा जाणकार व चोखंदळ वाचकवर्ग निर्माण करावा, लेखकाला व्यासपीठ मिळावे या हेतूने गेली एकतीस वर्षापासून 'विचारशलाका' काम करीत आहे. ‘विचारशलाका’ मध्ये महाराष्ट्रातील तर्कतीर्थांपासून तर ते महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठातले संशोधक, अभ्यासक, वैचारिक साहित्य लिहिणाऱ्या लेखकांचे लेखन प्रकाशित केले. यात डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. ना.य.डोळे, डॉ. ज.रा.शिंदे, डॉ. स.रा.गाडगीळ, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. र.ल. चौधरी या मराठवाडा परिसरातील लेखकांन बरोबरच डॉ. भास्कर भोळे, प्रा. एफ.एच. बेन्नूर, प्रा. देवदत्त दाभोलकर, श्री. स.मा.गर्गे यासारख्या लेखकांनी 'विचारशलाका' मध्ये आपले लेखन प्रकाशित करून वाचकांची वैचारिक बैठक निर्माण केली. तसेच 'विचारशलाका' ने वैचारिक साहित्य लिहिणारा एक लेखकवर्ग ही निर्माण केला. सामाजिक शास्त्र विचारविश्वातील जुन्या पिढीतले जेष्ठ विचारवंत आणि नवीन पिढीतले विचारवंत या दोघांना एकत्र प्रकाशित करण्याचे काम 'विचारशलाका' ने केले.
संपादकीय लेखन
संपादन‘विचारशलाका’चा प्रत्येक अंक हा विशेषांकच असावा ह्या संपादकीच्या भूमिकेमुळे अनेक विषयांवर विशेषांक प्रकाशित करून आपले वाड्.मयीनमूल्य जपण्याचा प्रयत्न केला. भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत जो मूल्यांचा आकृत्रिबंध आहे. त्या मूल्यांचा आशय लोकांना समजावा या हेतूने घटनेतील मूल्य आणि तत्त्व यावर भर देऊन लेखन केले.
विशेषांक
संपादन- न्याय संकल्पना विशेषांक (जुलै - सप्टें. ८७)
- धर्मनिरपेक्षता विशेषांक (ऑक्टोंबर - डिसें. ८७)
- लोकशाही विशेषांक (जाने. - जून ८८)
- समता विशेषांक (जुलै - डिसेंबर ८८)
- गं.बा.सरदार (जाने - मार्च ८९)
- पं. जवाहरलाल नेहरू (जुलै - डिसें. ८९)
- ग्रामीण विकास विशेषांक (जाने - मार्च ९०)
- प्रौढ शिक्षण विशेषांक (एप्रिल - जून ९०)
- म. जोतिबा फुले विशेषांक (जुलै - डिसें.९०)
- मंडल आयोग विशेषांक (जाने - मार्च ९१)
- विश्लेषक तत्त्वज्ञान विशेषांक (एप्रिल - जून ९१)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक (जुलै - डिसें.९१)
- उदारमतवादी विशेषांक (जाने.- मार्च ९२)
- शाहू महाराज विशेषांक (एप्रिल - जून ९२)
- साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विशेषांक (जुलै - डिसें. ९२)
- आचार्य शं.द. जावडेकर विशेषांक (जाने. ते मार्च ९४)
- भुकंप विशेषांक (एप्रिल - जून ९४)
- सामाजिक चळवळी विशेषांक (जुलै - डिसें. ९४)
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विशेषांक (जाने. ते मार्च ९५)
- गोपाळ गणेश आगरकर विशेषांक (एप्रिल ते जून ९५)
- महात्मा गांधी विशेषांक (जुलै - डिसें. ९५)
- सामाजिक शास्त्रे विशेषांक (जाने. ते मार्च ९६)
- विचारवंत व समाज विशेषांक (एप्रिल - जून ९६)
- भारतीय आव्हाने विशेषांक (जुलै - डिसें.९६)
- मुस्लिम समाज व साहित्य विशेषांक (जाने. - मार्च ९७)
- नियतकालिक विशेषांक (जुलै ते डिसें.९७)
- प्रबोधन विशेषांक (जाने. - मार्च ९८)
- जे.कृष्णमुर्ती विशेषांक (जुलै - डिसें. ९८)
- फॅसिझम विशेषांक (जाने. ते मार्च ९९)
- अमर्त्य सेन विशेषांक (एप्रिल - सप्टें.९९)
- भारतीय राज्यघटना विशेषांक (ऑक्टो.९९ - मार्च २०००)
- डॉ. धनंजयराव गाडगीळ विशेषांक (एप्रिल ते सप्टें. २०००)
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विशेषांक (ऑक्टों. ते मार्च २००१)
- इंग्रजी साहित्य विशेषांक - गो.न. मग्गीरवार गौरवांक (एप्रिल - सप्टें. ०१)
- भारतीय राजकारण विशेषांक - ना. य. डोळे श्रद्धांजली विशेषांक (ऑक्टों. ०० - मार्च ०२)
- हिंदी साहित्य विशेषांक (एप्रिल - सप्टें. ०२)
- विसाव्या शतकातील पाश्चात्य तत्त्वज्ञान विशेषांक - प्राचार्य हेमचंद्र धर्माधिकारी गौरवांक (ऑक्टों. ०२ - मार्च ०३)
- ग.प्र.प्रधान गौरवांक (एप्रिल - सप्टें. ०४)
- अस्तित्ववाद विशेषांक (ऑक्टो. ०४ ते मार्च ०५)
- ध्येयवादी इतिहास संशोधक विशेषांक (एप्रिल - सप्टेंबर ०५)
- वसंतराव काळे स्मृती विशेषांक (ऑक्टो.०५ - मार्च ०६)
- विसाव्या शतकातील पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ विशेषांक (एप्रिल - सप्टें.०६)
- विसाव्या शतकातील पाश्चात्य राज्यशास्त्रज्ञ विशेषांक (ऑक्टों.०६ ते मार्च ०७)
- द्विदशकपूर्ती विशेषांक (एप्रिल ते सप्टें. ०७)
- उच्चशिक्षण विशेषांक (ऑक्टों. ०७ ते जून ०८)
- दहशतवाद विशेषांक (जुलै ०८ ते जून ०९)
- महाराष्ट्र राजकारण विशेषांक (जुलै ०९ ते जुलै १०)
- समकालीन सामाजिक समस्या विशेषांक (जुलै ११ ते एप्रिल १२)
- यशवंतराव चव्हाण विचारविश्व विशेषांक (ऑक्टो.१२ - जून १३)
- समकालीन विचारवंत आदरांजली विशेषांक (जुलै -१३ ते जून १४)
- लोकसभा निवडणूक विशेषांक (ऑग. १४ ते जाने. १५)
- रा.ना.चव्हाण विचारविश्व विशेषांक (एप्रिल ते डिसें.१५)
- समकालीन सामाजिक चळवळी विशेषांक (एप्रिल - डिसें. १६)
- संत साहित्यातील नैतिक संदेश विशेषांक (जाने. ते सप्टें. १७)
- गुलामगिरी आणि विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य विशेषांक (ऑक्टों.१७ ते ऑक्टों. १८)
- बौद्ध तत्त्वज्ञान विशेषांक (जाने. १९ - सप्टें. १९) [१]
पुरस्कार
संपादन- ‘विचारशलाका’या नियतकालिकास महाराष्ट्र फाऊंडेशन, मुंबई १९९५ला पारितोषिक ५०,००० रुपये,
- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा १००० रूपयाचा शं.वा. किर्लोस्कार पुरस्कार १९९६.
- उत्कृष्ट साहित्य श्रेष्ठता पुरस्कार.
- लातूर जिल्हा पत्रकार संघाचा प्रथम उत्कृष्ट दिवाळी अंक दर्पण पुरस्कार १९९४.
- लातूर जिल्हा पत्रकार संघाचा प्रथम उत्कृष्ट दिवाळी अंक दर्पण पुरस्कार १९९५.
- लातूर जिल्हा पत्रकार संघाचा दितीय उत्कृष्ट दिवाळी अंक दर्पण पुरस्कार १९९६.
- काँग्रेस शताब्दी महोत्सव लातूर समिती, लातूरतर्फे शैक्षणिक व समाजिक क्षेत्रातील कार्याबद्दलसन्मानपत्र
संदर्भ
संपादन- 'विचारशलाका'ची सूची, संगीता व्यंकटराव मोरे, मैत्री प्रकाशन, लातूर.
- ‘द्विदशकपूर्ती विशेषांक’ (एप्रिल ते सप्टें. २००७)
- 'विचारशलाका'या नियतकालिकाचे वाङ्मयीन कार्य, अप्रकाशित संशोधन प्रबंध.(ph.d.साठी केलेले संशोधन), स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड.
बाह्य दुवे
संपादन- ^ मोरे, संगीता व्यंकटराव. 'विचारशलाका'ची सूची (जुलै ८७ ते सप्टें.१९) Check
|दुवा=
value (सहाय्य). ०८/०१/२०२० रोजी पाहिले.|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]