शंकेस/चर्चेस उत्तर देणे या प्रकाराची वर्गवारी संपादन

संतोष दहिवळ यांनी लिहिलेल्या काही मुद्द्यांचे तपशील छळणूक या प्रकारात मोडण्याविषयी शंका आहेत. त्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ते येथे चर्चा पानावर हलवले आहेत :

मूळ मुद्दे :

"विचारलेल्या शंकेला उत्तर न देणे"

संपादनासंबंधीत एखादी शंका उपस्थित केल्यास/झाल्यास त्या शंकेचे निरसन न करता त्याला उत्तर देण्यास टाळणे हे कृत्यसुद्धा छळणुकीत गणले जाते. चूक वाटलेल्या संपादनासंदर्भात शंका उपस्थित केली गेली तर शंका मांडणाराला उत्तर न देणे ही शंका मांडणाराची छळणूक ठरते.

"चर्चेस आमंत्रित करूनही सहभागी न होणे" एखाद्या वा अनेक संपादनासंदर्भात उपस्थित केल्या गेलेल्या मुद्यावर त्या संपादनाशी निगडीत असणाराला चर्चेत सहभागी होण्याचे आमंत्रण वा सूचना देऊनही चर्चेत सहभागी न होणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करून त्यास हतोत्साहित करणे व संपादने करण्यापासून जाणीवपूर्वक परावृत्त करणे हाही छळणुकीचा प्रकार आहे.

शंकेस/चर्चेस आमंत्रित केले असता, त्यास उत्तर मिळण्याची अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे. मात्र तसे न झाल्यास, "अझ्यूम गुड फेथ" (इंग्लिश : "Assumne good faith") - अर्थात इतर संपादकांच्या सहभाग-हेतूंवर भरवसा ठेवून मामला सौहार्दाने हाताळणे ही एक शक्यता ठरू शकते. त्या संपादकांना सहमती असण्याची किंवा अनेक प्राधान्यक्रमाच्या गोष्टींमुळे तसे घडले असण्याची किंवा प्रतिवाद पुढे चालू न ठेवण्याची शक्यता असू शकते. खेरीज कधी, कसे प्रतिसाद द्यावेत, हा व्यक्तिपरत्वे केलेला निर्णय असू शकत असल्यामुले त्याला सरसकटपणे छळणूक म्हणता येणे अवघड आहे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १०:२८, ११ जून २०१२ (IST)Reply


""संपादनासंबंधीत एखादी शंका उपस्थित केल्यास/झाल्यास त्या शंकेचे निरसन न करता त्याला उत्तर देण्यास टाळणे हे कृत्यसुद्धा छळणुकीत गणले जाते. चूक वाटलेल्या संपादनासंदर्भात शंका उपस्थित केली गेली तर शंका मांडणाराला उत्तर न देणे ही शंका मांडणाराची छळणूक ठरते.""

हा नियम राजकारणी लोकांना लावला तर किती बरे होईल आणि किती प्रश्न चुटकीसरशी सुटतील!!! आभिजीत १०:३४, ११ जून २०१२ (IST)Reply

विकिपीडियावर काही संपादकांना छळणुक करणाऱ्यांना ब्लॉक करण्याचा अधिकार दिलेला असतो त्यामुळे असे अधिकार असणाऱ्यांना या छळणुकीचा त्रास होत नाही कारण आपला अधिकार वापरून छळणुक करणाऱ्यांना त्यांना लगेच ब्लॉक करता येते मात्र ज्यांच्याकडे असे अधिकार नाहीत त्यांच्याकडे निमूटपणे विकिपीडिया सोडून जाण्याशिवाय पर्याय नसतो म्हणून छळणुकीमुळे दबाव येऊन त्यांना विकिपीडिया संपादनाचा आनंद उपभोगता येत नाही.

विकिपीडियावर संपादकांना छळणुक होत आहे असे जाणवत असेल तर त्यांनी तातडीने प्रचालाकांशी संपर्क साधून अशा छळणुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती करू शकतात. या संदर्भात विकिपीडिया:Sysop Actions या पानावर प्रचालक चर्चा करून आणि खातरजमा करून छळणुक करणाऱ्यांवर योग्य अशी कारवाई करतील. यामुळे जुने तसेच काम करणारे संपादक निश्चिंत पणे मराठी विकिपीडिया वर काम करू शकतील आणि संपादनाचा आनंद उपभोगू शकतील. - Mvkulkarni23 ११:३९, ११ जून २०१२ (IST)

संबंधितांनी त्यांच्याशी निगडित वाटणारे मुद्दे वगळले संपादन

संकल्प द्रविड यांनी त्यांच्याशी निगडित वाटणारा मुद्दा चर्चेसाठी मुख्य पानावरून चर्चा पानावर घेतला आहे असे माझे मत आहे.

त्यांचेच पाहून मंदार कुलकर्णी यांनीही त्यांच्याशी संबंधित वाटणारा मुद्दा लगेच येथे आणून योगदानात भर घातली.(हेही माझेच मत)

परंतु तरीही मुख्य पानावर मी भर घातलेला एक मुद्दा यांच्याशी संबंधित नसावा असे माझे मत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तो चर्चा पानावर घ्यायचा राहिला असेल. नजरचुकीने वगळायचा राहिला असल्यास आठवण म्हणून येथे नमूद केले. मुख्य पानावरही तशी नोंद केली आहे.

-संतोष दहिवळ (चर्चा) १९:५९, ११ जून २०१२ (IST)Reply

Return to the project page "छळणूक".