विकिपीडिया:WikiProject Nashik Marathi/Sandbox

मराठी नाशिक अपडेट

इंग्रजी - मराठी ट्रान्स्लेशनची लिंक संपादन

http://transliteration.yahoo.com/marathi/

इंग्रजी सॅंडबोक्सची लिंक संपादन

https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:WikiProject_Nashik/Sandbox

= सिंहस्थ कुंभमेळा = संपादन

नासिक क्षेत्री भरणारा कुंभमेळा हा गुरु ग्रह सिंह राशीला आल्यावर भरतो. स्थ म्हणजे रहाणे म्हणून या कुंभमेळ्याला सिंहस्थ असे म्हणतात. गोदावरीचे स्नान पवित्र मानले आहे. दर बारा वर्षानी गुरु सिंह राशीला जातो त्यावेळी नासिकला गोदावरीत स्नान, दान, जप, तप इत्यादी केल्याने पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. याकाळात साक्षात गंगा गुप्तरुपाने गोदावरीस भेटण्यास येते, त्याचबरोबर साडेतीन कोटी तीर्थ आणि तेहतीस कोटी देव हे पर्वकाळात गोदावरीच्या सान्निध्यात येतात, असे पुराणे सांगतात. 117.208.13.201 २२:१५, २६ फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]

पुराण संपादन

काळाराम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. प्रभू रामचंद्रर अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य पाहून स्तंभित झाले. ह्या स्थानाचा मोह उत्पन्न होऊन त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी निर्माण करविली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि मनोविकार शून्य होतात. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.[३]

सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.

नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज ३ कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.

गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.

याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत, तसेच काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत. नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात

कला व संस्कृती संपादन

वास्तुकला संपादन

स्थापत्या हा शब्द स्था-स्थिर राहणे या शब्दापासून बनला आहे. प्राचीन चौसष्ट कलांपैकी एक असणाऱ्या वास्तूविध्येत याचा समावेश होतो. यात गृहे, मंदिरे, प्रसाद, तट, मनोरे, बुरुज, किल्ले, तलाव, विहिरी, कालवे, स्टूप, विजयस्तंभ इत्यादींचा समावेश होतो. ते बांधण्याचे एक शास्त्रा आहे. त्यात अनेक शैलींचा स्मावेश होतो. प्रत्येक शैलीवर तत्कालीन भौगोलिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थितीचा परिणाम होऊन विविधता आलेली दिसते. परंतु, त्याचा मुख्य आधार एखादा स्थापत्यशास्त्रावरील ग्रंथातील शास्त्रा हाच असतो. नाशिकमधील स्थापत्य कलेचे विभाजन सातवाहन काळ (इ. स. पूर्व १ ले शतक ते इ. स. ३ रे शतक), यादवकाळ (इ. १० वे शतक ते १३ वे शतक), मुघल-मराठा काळ (इ. स. १६ वे - १७ वे शतक), पेशवा काळ (इ. स. १७ ते १८ वे शतक), ब्रिटिश काळ (१९-२० वे शतक) अशा कालखंडात केले जाते. सातवाहन काळानंतर यादव कालापर्यंतचा काळ हा डार्क पॅच म्हणावा लागेल कारण या कालखंडातील फारसे अवशेष उपलब्ध नाहीत.


सातवाहन कालखंड (इ. स. पू. १ले शतक ते इ. स. ३रे शतक) या कालखंडातील शैलगृह म्हणजे पांडवलेणी हा स्थापत्यकालेचा उत्कृष्ट नमुना आजही दिमाखात उभा आहे. ही लेणी म्हणजे बौध्द भिक्खूंचे पावसाळ्यातील निवासस्थान होय. यातील शिलालेखांवरून लेणीच्या काळाचा अंदाजा येतो. या लेण्यात चैत्यगृह म्हणजे प्रार्थनागृह, सभागृह, भोजनगृह, स्नानपोढी म्हणजे अंघोळीच्या पाण्याची टाकी, कोढी म्हणजे पूजेचे कोनाडे यांचा समावेश आहे. अशी शैलगृहे खोदताना तयार होणाऱ्या गृहेचा संपूर्ण आराखडा तयार केला जाई.

यादव कालखंड (इ. स. १० वे ते १३ वे शतक) नाशिक परिसरात या कालखंडातील अनेक मंदिरे उभी आहेत ज्याला स्थानिक भाषेत हेमाडपंथी मंदीर असे संबोधले जाते. हेमापंत/हेमाद्री हा यादवांचा मंत्री होता. त्यावरून या शैलीला त्याचे नाव मिळाले. वस्तुत: हेमाद्रीच्या पूर्वीपासून या शैलीतील मंदिरे बांधली जात होती. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे सिमेंट किंवा चुण्याचे वापर न करता एक पाषाण दुसऱ्या पाषाणवर ठेऊन केवळ संतुलन साधून उभे करून दोन पाषाण जोडण्याकरिता खोबणीचा वापर केला जाई.

अनजनेरी येथे यादवकाळातील १६ मंदिराचा समूह आहे. त्यामध्ये काही हिंदू आणि काही जैन मंदिरे आहेत. त्यांची शिखरे नागर आणि भूमीज या दोन्ही प्रकारची आहेत. सिन्नर येथील ऐश्वरेश्वराचे मंदीर हे वेसर शैलीत बांधले असून, गोंदेश्वराचे भूमीज शैलीत बांधले आहे.

गोंदेश्वराचे मंदीर हे पंचायतन मंदीर आहे. याचे विशेष म्हणजे मुख्य मंदिराचे शिखर जरी भूमीज प्रकारचे असले तरी आयत्नाची शिखरे जरी भूमीज प्रकारचे असले तरी आयतनांची शिखरे मात्र नागर पध्दतीची आहेत. देवळाणा, ओढा, धोडांबे, झोडगे आदी ठिकाणीसुध्दा या काळातील मंदिरे अस्तित्वात आहेत. मंदिरे पाषाणात घडवली गेली असल्याने चीरकाल टिकून आहेत; पण नागरीवास्तू विटा-लाकूड यापासून बनवत असल्याने त्यांची अवशेष आज उपलब्ध नाहीत.

मुघल-मराठा कालखंड (इ. स. १७ वे - १८ वे शतक) या काळात संरक्षक शिल्पाचा एक नवीनच प्रकार रूढ झाला तो म्हणजे 'गढी'. गढी म्हणजे सुरक्षित निवासस्थान. एका प्रशस्ता प्रासादाभोवती अतिशय बळकट अशी तटबंदी उभारण्यात येई. याचा नाशीकमधील नमुना म्हणजे काझी गढी. इ. स. १६६७ मध्ये काझी सय्यद महंमद हसनने काझीपुरा वसवला आणि काझी दरवाजा बांधला. याच काळात नाशिकचा त्यावेळचा सुभेदार तुदेरखान याने इ. स. १६८१ मध्ये दिल्ली दरवाजा आणि औरंग दरवाजा (त्र्यंबक दरवाजा) बांधला. गढीच्या पश्चिमेला जामा मशीद आहे.

पेशवा कालखंड (इ. स. १८ वे शतक - १९ वे शतक) हा कालखंड म्हणजे मराठी सत्तेचा सुवर्णकाळ होता. या काळात ऐशवर्य आणि समृध्दी प्राप्त झाल्याने कलागुणांना प्रोत्साहन मिळाले दिसते.

इ. स. १६९६ मध्ये सातारच्या चित्राव यांनी बांधलेल्या रामकुंडाची सुधारणा गोपिकाबाईंनी इ. स. १७६२ मध्ये केली. इ. स. १९६३ मध्ये त्यांनी सीतकुंड बांधले. इ. स. १७६१ ते १७७२ मध्ये व्यंकटराव पेठे यांनी खंडोबाचे कुंद बांधले. इ. s. १७७५ मध्ये अहिल्याबाई कुंद आणि नदीपत्रातील घाटाच्या पायऱ्या बांधल्या. ई. स. १७१८ मध्ये कपालेश्वर मंदीर कोळी लोकांनी बांधले. त्याचा बाहेरचा भाग जागजीवनराम पवार यांनी बांधला. इ. स. १७५६ मध्ये चंद्रचूड यांनी सुंदरनारायणाचे मंदीर बांधले. व्हिक्टोरिया पुलाजवळील हे मंदिर पूर्वाभिमुख असून नक्षत्राकार आहे. इ. स. १७४७ मध्ये नारोशंकर राजेबहादर यांनी नारोशंकराचे मंदिर बांधले. अत्यंत सुंदर व शिल्पांनी समृध्द असणारे हे मंदिर नागरशैलीत आहे. इ. स. १७८२ मध्ये ओढेकरांनी बांधलेले काळाराम मंदिर हे नाशिकचे मुख्य आकर्षण आहे. इ. स. १७९० मध्ये गणपतराव दीक्षित यांनी बांधलेले भद्रकाली मंदिर आणि व्यंकटेश बालाजी संस्थानचे बालाजी मंदिर या मंदिराचे वैशिष्ट्यम्हणजे यांना शिखर नाहीत.

काष्ठशिल्पांबरोबरच नाशीकमधील काही वाड्यांच्या दर्शनी भागावर चित्रे चितारलेली दिसतात. गेरुचा गिलावा करून त्यावर चुना आणि कोळसा यांच्या सहायाने चितारलेली नक्षी किंवा शेषशायी विष्णू, चवरीधारी किंवा गणपती यांची चित्रे आजही बघायला मिळतात. चांदवड, येवला या ठिकाणच्या वाड्यात विविध रंगांबरोबरच सोन्याचाही वापर केलेला आढळतो. पंचवटीतील शंकराचार्य समाधी मंदिर, अहिल्याराम मंदिर, मुढ्यांचे राम मंदिर, सुंठवाल यांचा वाडा यावर ही चित्रे आहेत. अशा या भव्य दिव्य वाड्यांचे बांधकाम करण्यापूर्वी पाण्यासाठी विहिरी खणल्या जात असत त्यांना 'आड' असे म्हणतात. आजही नाशीकमधल्या बहुतेक वाड्यांमध्ये पाणी असलेल्या आड आहेत.

नृत्य संपादन

नृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित. हैदर शेख यांचा उल्लेख आढळतो.त्यानंतर सौ.रेखा नाडगौडा(कथक),सौ.संजीवनी कुलकूर्णी(कथक), सौ.विद्या देशपांडे(कथक),[१]सौ.माला रॉबिन्स(भरतनाट्याम).इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरु केले.

इतिहास संपादन

नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय) नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यासंस्कृती प्रचारातील आरम्भस्तंभ मानले जाते.गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्यावेळेस ते रहिवासी होते . सातवाहन काळात नाशिकला फार महत्व होते. ई.स.१५० मध्ये भारतात आलेल्या टोलेमी या इजिप्तिअन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा गौरव केला. ईसविसन च्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णी च्या काळापर्यंत चालू होता. ई.स.१०५-१०६ च्या दरम्यान नाहापन या शत्रपने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले. ई.स १२४-१२५ च्या दरम्यान नाहापानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला. नाह्पानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. ई.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला. ई.स ८०-१२५ हा शत्रप वर्चस्वाचा कालखंड होता . त्याचप्रमाणे ई.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते.अभिर या प्रदेशातील गवळी राजे होत. अंजेनेरी हि त्यावेळची राजधानी प्रारंभी ती शत्रापांची होती. ई.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्या साम्राज्याचा या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली. सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोरांची सत्ता आली. त्यांनी मयुरखंडी (जि.नाशिक )ला नाशिकची राजधानी बनविले. नववे व दहावे शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर देवगिरी किला हि राजधानी असल्या कारणाने ई.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते. ई.स. १५३० मध्ये बेहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. सतराव्या शतकात हा भाग मुघल राजवटीत होता. मुघलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशांनाबाद ठेवले. व सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. ई.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला. ई.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.↑[२] , ↑[३][४]

सातवाहन राजवंश 1)सिमुक 2)कृष्ण 3)सातकर्णी १ 4)वेदश्री 5)शक्तीश्री 6)पुर्नोत्संग 7)स्कन्द्स्भि 8)२रा सातकर्ण 9)लम्बोदर 10)आपीलक 11)मेघस्वाती 12)स्वाती 13)स्कन्द्स्वति 14)मुगेंद्र 15)कुंतल 16)स्वतीवर्ण 17)प्रथम पुलोमावी 18)अरीष्ठ्याकर्ण 19)हाला 20)मंतलक 21)पुरीन्द्रसेन 22)सुंदर सातकर्णी 23)चकोर 24) शिवस्वाती 25)गौतमीपुत्र सातकर्णी 26)वासिष्टीपुत्र सातकर्णी 27)वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी 28)गौतीमिपुत्र यंज्ञ सातकर्णी 29)माथारीपुत्र शक्सेन 30)गौतमीपुत्र विजय सातकर्णी 31)वासिष्टीपुत्र चंद्रास्वती 32)तृतीय पुलोमावी .↑[५]


यादव काळ तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजास कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये ताबा घेतला.
ई.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले. व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती. सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.
ई.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८, च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.
अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमणानंतर यादवांचा पाडाव झाल्यावर त्याने नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.
खिल्ज्जी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अख्यारीत हा प्रदेश बहामनी राजवटीत ई.स. १३४७-१४९० पर्यंत होता.
ई.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.
अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मुघल सुभेदारीत समाविष्ट झाला.↑[६]


मुस्लिम कालखंड ई.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वताचा राज्यकर्ता म्हणून घोषित केला.
ई.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.
ई.स १३४७ हा प्रदेश बहमनी साम्राज्याचा दौलातबाद उपप्रांताच्या अख्यारीत आले.
ई.स.१३६६ मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविन्देवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडून आणले.
इ.स.१६०९ मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणात आला.
इ.स.१६३२ मध्ये पर्यंत मुघलांनी दक्खन, वऱ्हाड,खानदेश प्रांताचे नाशिकमध्ये मुघल साम्राज्याचा पाया पक्का केला.
इ.स.१६८२ पर्यंत मुघलांनी बरेच विजय मिळवले.
शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद(नाशिक) केली.
इ.स.१६८८ मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.
इ.स.१६९६ मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.
इ.स.१७०७ पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्युपर्यंत हा भाग मुघालाच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फीकर खान, ममार खान ,मतबर खान आदी अधिकारी नाशिक खानदेश्वर नियुक्त होते.
शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरसावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बालाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मुघलांकडून दखनची चौथ,सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याचा उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.
बागलाण गलना भागात दाभ्याडांची पकड होती. ई.स.१७३१ या काळात पहिल्या बाजीराव ने नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.↑[७]

मराठा कालखंड ई.स.१७४७ पर्यंत म्हणजेच औरंगजेबाने मृत्यूपर्यंत हा भाग मुघलांच्या ताब्यात होता.
ई.स.१७४७ नंतर मराठ्यांचा नाशिकवर पूर्ण अंमल झाला.
सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशांकाराची घंटा बांधली.
१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.
सरदार चंद्रचूड यांनी १७५६ मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले.
काळाराम मंदिराच्या जीर्नोधाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.
१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.
व बाजीराव यांच्या मृत्युनंतर त्यांचे ज्येष्ठ मुलगा नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले.
तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. ई.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गाडीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबाद्वरून मराठ्यांवर चाल केली.
परंतु मराठ्यांनी त्याला ई.स.१७५२ च्या शांतता करार होऊन परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला.
पहिल्या निजामाच्या मृत्युनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नाशिक नाव पुन्हा सुरु केले.
ई.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नाशिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.
ई.स.१७६१ माधवराव पेशवे पदावर आले. नानासाहेबाच्या मृत्यूनंतर हे पद मिळाले.
ई.स.१७६३ विनायक रावने पेशवे प्रदेशातील नाशिक,जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली.
यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.
ई.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लोप्च्या ब्रिटीश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील थाळनेर,चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.↑[८]

ब्रिटीश कालखंड ब्रिटीशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.
१८५७ मध्ये नाशिक महत्वाचे ठिकाण बनले. ब्रिटीश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिक व उत्तर अहमअदनगर भिलांनी सहभाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले.
ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्तव घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटीश विरुध्द बंडाचा झेंडा फदकवला .
आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतला. त्याच्या बंदोबस्तासाठी ले.हेन्री ,टी.थेचेर,एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नर चा माम्लेदाराने त्याला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकारावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातील २४ गावात छोट्या जाहीगरीत शिरले.यावेळी ब्रिटीश धाजीन्या राजे भगवंतराव व त्याच्या माणसास फासावर लटकावले. भोगाजी नाईक हे बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅप. नतलरने वर्षभर प्रयत्न केले. पण जमले नाही. ते ब्रिटीशांशी सिन्नर ,येवला भागात लढले. भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास मि.सुतर ह्या इंग्रज सेनानीने यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती. ई.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.
ई.स.१८६१ मध्ये अग्लो वेर्नाक्युलर स्कूल ची स्थापना झाली.
ई.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.
ई.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.
ई.स.१८७७ मध्ये गोपाल्हारी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
ई.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन
ई.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.
मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झाल्कावू लागली.
१.वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळा चा कारभार तेथून सांभाळला.
२.टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलारला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.
३.मित्रामेलात औरंगाबाद चा अनंत कन्हेरे चा समावेश झाला.
४.२१ डिसेम्बर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी मि.जक्सन ला गोळ्या घातल्या.
५.जक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाल कर्वे,नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.
६.२९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे,देशपांडे यांना फाशी देण्यात आली.त्यांचे योगदान स्वन्त्र लढ्यत महत्वाचे होते.
७.सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.
८.२५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.
९.आंबेडकरांचे नाशिक मधील योगदान हि महत्वाचे होते.
१०.आम्बेडकारवरून काळाराम मंदिरात अस्पुर्श्याना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला.↑[९]
Aakash Satpute (talk) 07:32, 2 February 2015

लक्षणीय लोक संपादन

नाशिकची संगीत परंपरा संपादन

विष्णु दिगंबर पलुस्कर विष्णु दिगंबर पलुस्कर ह्या युगपुरुषाचा अवतार संगीत क्रांतीच्या योगदानासाठी खूप मौल्यवान ठरला."गंधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय. (लोकमत ८/४/२००६) विष्णु दिगंबर पलुस्कर हे निःसीम राम भक्त होते."गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी,थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली.१९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तीतवात आहे (लोकमत-रसिका ७/९/२०००).विष्णु दिगंबर पलुस्कर ह्यांना जरी बलपणी अंधत्व येऊनही त्यांनी संगीतला "संगीत प्रेस" च्या नावाने डोळे दिले.(लोकमत-रसिका ७/९/२०००) पंडित विष्णु दिगंबर पलुस्कारांच्या निधन ऑगस्ट १९३१ सली झाले,त्यानंतर त्यांचा संगीतीक आणि सर्वारधारने वरसा संभाळला तो त्यांचे पुत्र व भारताचे अनमोल रत्न पंडित दत्तात्रय विष्णु पलुस्कर.

मातोश्री गंगाबाई पलुस्कर गंगाबाईंचे कार्य समजोद्धरक सवित्रिबाई फुलेंच्या तोडीचे होते.सवित्रिबाईंनी स्त्री समजत शैक्षणिक साक्षरता आणली,तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली.स्त्रीला अत्यंता हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दीव्य करणे साधी गोष्ट नव्हती.नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डवीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो."गंधर्व महाविद्यालय" त्यावर पुढे लिहिलेले आहे की "येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल".याची स्थापना १९३१ सलच्या ललित पंचमीस झाली.१९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली.संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख आवर्जुन आशाकरिता करवसा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्रागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मतोश्रींनाच जाते.–समरणिका व (स्त्री जीवा विषयक स्थियंतर/प्रकाशक-भारतीया इतिहास संकलन समिती,नाशिक)

गोविंदराव पलुस्कर पं.डी.व्ही. पलुस्करांनंतर नाशिक मध्ये संगितची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आजचे नाशकातील ऋषीतुल्य व चतुरस्त्र गायक पंडित गोविंदराव पलुस्कर होय.शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तलाची समाज होती.अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानवर संगितचे शुद्ध संस्कार होऊ लागले.ज्या पलुस्कारांच्या संगीत कस्तुरीचा सुगंधा लुटण्यासाठी अवघे संगीत जग असुसलेले असे,त्या पलुस्कर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला तो त्यांच्या काका पं.डी.व्ही पलुस्कर यांच्या मुळे.बालाजी संथानाच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले (लोकमत २८/७/९९) पलुस्कर परंपरेतील अत्यंता महत्वाचा टप्पा म्हणून पा.गोविंदरावांनकडे बघितले जाते.विशेषत: महराष्ट्राबाहेरही पलुस्कर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंता महत्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे.सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापणाचे कार्यच केले नही,तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला.अशी कारकीर्द गाजवण ही साधी गोष्ट नही.(लोकमत २१/२/२००२) आकाशवाणी औरंगाबाद,जाळगाव,कटक,जयपूर,लखनौ,पिलानी ह्या केंद्रावरून ते शास्त्रीय गायन करीत.संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली अलंकर केले.दरम्यान,कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधला अ.भा.गंधर्व महाविद्यालयाने मान्याता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहल केले.त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले ही रत्न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुस्कारांच्या स्वरमधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली.मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेश लिकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी,होरी,कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.(लोकमत २८/७/९९) संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले.पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर,पंडित चिंतमाणराव पलुस्कर (पंडित गोविंदरावांचे वडील), स्व.गंगाबाई पलुस्कर(मातोश्री),पंडित डी.व्ही. पलुस्कर व आता पंडित गोविंदराव पलुस्कर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.(लोकमत २१/२/२००२)

"महामोहोपाध्य" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे.अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणार्या विद्वान व बहु आयामी गायक,शिकक्षक आणि कलकार यांना हा बहुमन प्रतेयक तीन वर्षातून एकदा अखिल भारतीया पातळीवर दिला जातो.या आधी पंडित भीमसेन जोशी,गंगुबाई हनगल,हिराबाई बडोदेकर,पंडित वि.रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुस्कर यांच्या मागे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची परंपरा तर आहेच;पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीया प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिल आहे,ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा ध्यनिष्ठ प्रवास अधोरेखित करणारा आहे.(सकाळ ७/१२/२००८) पुरुषोत्तम ऊर्फ बाळ भाटे:- श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पुरुषोत्तम पांडुरंग भाटे यांचा जन्म झाला.बाळ या नावाने त्यांचा उल्लेख केला जायचा.प्राथमिक शिक्षण त्र्यंबकेशवर मध्ये झाल्यावर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नाशिकमध्ये घेतले.जन्मजात गोड गळ्याची देणगी त्यांना मिळाली होती.अभंग,भजने आणि शालेय कविता ते सुस्वरात गात.त्यांच्या कलागुणात साहित्य हा उत्तम गुण प्रकटला होता.बालपणापासून आपणही आगळेवेगळे करावे याची त्यांना प्रेरणा दादासाहेब फाळके यांच्यामुळे मिळाली. बाळ भाटे यांच्या गायन कलेला नाशिकच्या धार्मिक,सांस्कृतिक संस्थांमधून चांगला प्रतिसाद मिळू लागला.नाशिकमध्ये त्यांनी प्रथम ‘गीतरामायण’ ची कार्यक्रमाद्व्यारे मुहूर्तमेढ रोवली.महाराष्ट्राला आपल्या भावगीत गायनाने रसिकांना खिळवून ठेवणारे गजाननराव वाटवे यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले.त्यातूनच त्यांच्या घराच्या बाहेर अध्यापाकाऐवजी काव्य गायक असा फलक झळकला.बाळ भाटे यांनी पहिल्यांदा गदिमा अण्णांच्या गीतावर आधारित ‘चैत्रबन’ हा कार्यक्रम सादर केला.बाळभाटे यांचा नाट्यप्रवास सुरु झाला.त्यांच्या व्यक्तिमत्वात गायक,कवी,नाटककार,संगीतकार,रंगकर्मी,नाट्यलेखक असे विविध पैलू सामावलेले होते.त्यांनी चौदाहून त्यांनी लिहिली.त्यातील दोन नाटके व्यवसायिक संस्थांनी स्वीकारली.’याजसाठी केला होता अट्टाहास’आणि ‘पराभव’ या उत्कृष्ट नाटकांमुळे नाट्यलेखक म्हणून त्यांची नाट्य वर्तुळात चर्चा होती. [१०]

  1. ^ नाशिक- मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे - डॉ. सरल धारणकर
  2. ^ ३)सातवाहन आणि पशिमी शत्राप यांचा इतिहास आणि कोरीव लेख -वा.वि.मिराशी ,पान न.४८,४९
  3. ^ २) नाशिक त्रंबक (इतेहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६,२७,३१,३२,३३,३४,३५,३७,३९,४०,४२,
  4. ^ १) भारतीय संस्कृती कोश-पं.महादेव शास्त्री जोशी पान न. ८२,८३
  5. ^ ३)सातवाहन आणि पशिमी शत्राप यांचा इतिहास आणि कोरीव लेख -वा.वि.मिराशी ,पान न.४८,४९
  6. ^ २) नाशिक त्रंबक (इतेहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६,२७,३१,३२,३३,३४,३५,३७,३९,४०,४२,
  7. ^ २) नाशिक त्रंबक (इतेहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६,२७,३१,३२,३३,३४,३५,३७,३९,४०,४२,
  8. ^ २) नाशिक त्रंबक (इतेहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६,२७,३१,३२,३३,३४,३५,३७,३९,४०,४२,
  9. ^ २) नाशिक त्रंबक (इतेहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६,२७,३१,३२,३३,३४,३५,३७,३९,४०,४२,
  10. ^ सकाळ नाशिक शहर today,सोमवार,१५ डिसेंबर २०१४