"मराठी सायबर आर्मी " महाराष्ट्रातील सायबर सुरक्षितते बद्दलचे एक नाव. दिनांक ६ ऑगस्ट २०११ रोजी मराठी सायबर आर्मीची स्थापना झाली, महाराष्ट्रावर होणाऱ्या सायबर हल्ले रोखणे आणि अश्या सायबर हल्ल्यात बळी ठरलेल्यांना योग्य ती मदत देणे या उद्दीष्टाने मराठी सायबर आर्मीची स्थापना सनी देशमुख आणि प्रथमेश ललिंगकर यांनी केली,

सुरवातीला दोघांनी सुरु केलेल्या या संस्थेत नंतर असंख्यजण सामील झाले, आज मराठी सायबर आर्मीत १० ते २० जण हे जवळ पास १५,००० जणांचे नेतृत्व करतात, त्यांना सायबर हल्यापासून वाह्ण्य्साठी योग्य ती माहिती देतात, असंख्य प्रश्नांची उत्तरे देतात, तेही विनामूल्य, महाराष्ट्राला सायबर हल्ल्यानपासून सुरक्षित ठेवणे एवढे एकच उद्दिष्ट मराठी सायबर आर्मीचा आहे.

तसेच मराठी सायबर आर्मीच्या वेबसाईटवर तुम्हाला महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवन घेवानाचीहि माहिती मिळेल जसे कि गणपतीच्या त्या दहा दिवसात मराठी सायबर आर्मी आपल्या होमपेजच्या मार्फत गणपती बसवतात, दिवाळीच्या वेळेसहि होमपेजच्या मार्फत दिवाळीचे महत्व सांगितले जाते, कोणत्याही सणाची माहिती तुम्हाला येथे भेटू शकते,