विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५

आज स्पर्धेनिमित्त लिखाणाला विषय मिळाला म्हणून नाहीतर बऱ्याच दिवसांपासून मनातले विचार मांडावे वाटत होते म्हणून लिहिते मी लहान असताना एका मंदीरात हॉलमध्ये स्त्रियांविषयी असलेले कायदे योजना यावर वकील व महिला आणि बालविकास कल्याण अधिकारी बोलत होते.खूप महिलांनी उपस्थिती दाखवलेली तेव्हा कानावर पडलेला अबला स्त्री असा शब्द त्याचा अर्थ आज समजतो बल म्हणजेच ताकद शक्ती आणि अबल म्हणजे शक्तीहिन ताकद नसलेला मग हा पुरुष असो वा स्त्री कोणालाही हा शब्द लागू शकतो म्हणजे जेव्हा आपण स्त्रिया आजारी असतो मासिक धर्म पाळत असतो तेव्हा थोडा बल शक्ती कमी होणे साहजिकच ना!मग एवढं काय त्याला आबला वगैरे म्हणून टॅग करायचं सरळ सरळ समस्त स्त्री जातीला आबला स्त्री असं संबोधलं जातं ते कशासाठी? जेव्हा पुरुषांचे बल शक्ती कमी होते पुरुष शारीरिक दृष्ट्या आजारी पडतात किंवा कमजोर दुर्बल असतात तेव्हा सरळ सरळ कोण अबला पुरुष असे फारसे म्हणायला जात नाहीत आजारपण शारीरिक बदल हा थोड्या काळासाठी होतोच मग त्यासाठी कायमचा अबला स्त्री अबला पुरुष हा टॅग कशाला अबला स्त्री अबला स्त्री हा अबलाचा तबला वाजवायचा बंद केला पाहिजे कारण स्त्री अबला नसून सबल आहे हा तिच्या नैसर्गिक शारीरिक रचनेमुळे किंवा प्रजननाच्या देणगीमुळे ती थोड्या कालावधीसाठी स्पर्धेतून मागे थांबू शकते पण एखाद्या शिकार करणाऱ्या प्राण्याप्रमाणे ती आपल्या कुटुंबाची नातेवाईकांची मुला बाळांची योग्य अनुकूल स्थिती पाहून थोड्याशा मोकळ्या वेळेत सुद्धा आपल्या यशप्राप्ती वर आरामात झडप घालून यशस्वी सुद्धा होऊ शकते. हा स्त्री धर्माचा लपलेला चांगुलपणा आहे .

          स्त्रीवाद हा खूप जुना चर्चेचा विस्तृत विषय आहे या विषयावर आपण आतापर्यंत खूप वाचन लेखन केलेले आहे.हा न संपणारा विषय आहे बदलत्या काळानुसार बदललेले स्त्री जीवन अगदी वाखाण्याजोगे आहे आधुनिक स्त्री नक्कीच आत्मनिर्भर आहे. 19 व्या शतकातील स्त्री जीवन आणि विसाव्या शतकातील स्त्री जीवन या कालांतरात स्त्रीची स्वतंत्र वैचारिक सामाजिक आर्थिक प्रगती झालेली आढळते. सध्या झालेल्या आयटी क्षेत्रातील शोधामुळे स्त्रीसाठी तिच्या वैयक्तिक प्रगतीसाठी एक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे.आजची स्त्री तिला येणारी एखादी कला, छंद तिची सृजनशीलता ती जगासमोर मांडू शकते आणि जगाकडून कौतुकास पात्र ठरू शकते. ही आनंदाची गोष्ट आजच्या स्त्रीला उभारी देऊ शकते तिचे मनोबल मनोधैर्य नक्कीच वाढू शकते आणि ते वाढलेले सुद्धा आहे.
       खूपदा असे म्हटले जाते की भारतात पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा आहे तरीसुद्धा प्रसार माध्यमामुळे पराक्रमी पुरुष सुद्धा स्त्री रक्षणासाठी पुढे सरसावलेले दिसून येतात हा काही कमी बदल नाहीये. एकविसाव्या शतकातली स्त्री सुशिक्षित आहे पुरुषांबरोबर कमावणारी आहे मात्र तिच्याकडे प्रजनन असल्याकारणाने ती थोडी व्यस्त असते मुला बाळांचे संगोपन दुग्धपानाची जबाबदारी यामुळे तिला प्रथम प्राधान्य आपल्या मुलांना द्यावं लागतं ती स्वतःचा पूर्ण वेळ फक्त स्वतःसाठी कधीच देऊ शकत नाही. तिला कधी कधी सामाजिक, कौटूंबिक, जबाबदारी पेलावी लागते व ती या सर्वांसाठी नैसर्गिक रित्या तयार असते. स्त्री निसर्गतःच संयमी कोमल,धैर्यशील, शौर्यशील, कार्यशील अविष्कारी,सृजनशील आहे यात शंकाच नाहीत.
            "पराक्रमाचा पुरुषार्थ पुरुष करू शकतात आणि स्त्री सुद्धा पण मातृत्वाचा अविष्कार फक्त स्त्रीकडेच असतो" प्रसार माध्यमामुळे सध्याचा काळ तिच्यासाठी खूप अनुकूल आहे प्रसार माध्यमामुळे सामाजिक जनजागृती झाल्यामुळे सामाजिक वैचारिक पातळी झपाट्याने वाढली आहे माहिती व प्रसार माध्यमामुळे लगेच जागतिक चर्चा होऊ शकते व काय वाईट आणि काय चांगले हे समाजापर्यंत लगेच पोहोचते त्यामुळे मी माहिती व प्रसार माध्यमांची खूप खूप ऋणी आहे.
         आताच्या काळातील पुरुष सुद्धा महिलांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात दिसतात व ते कुटुंबामध्ये देखील स्त्री वर्गाला तिच्या कार्यक्षेत्रात मदत करताना दिसतात हा बदल प्रसारमाध्यमामुळे पटकन घडून आला असे मला वैयक्तिक वाटते.
              भविष्यकाळात पुढे देखील समस्त स्त्रीवर्गासाठी अशीच अनुकूल परिस्थिती राहो व स्त्री स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी सुखकर, आनंदीदायी, वात्सल्यकारी, ममत्वधारी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏