विकिपीडिया:सफर/विषयांची यादी
बौध्द म्हणुन बौध्दांची अस्मिता जागृत करणारी बौध्द साहित्य प्रसार संस्था
बौध्द साहित्य प्रसार संस्था या संस्थेची स्थापना केवळ बौध्द म्हणुन बौध्दांच्या अस्मिता जागृत करण्याच्या दृष्टिने करण्यात आली.आजपर्यंत दलित म्हणुन अनेक साहित्य संमेलने झाली परंतु ती केवळ मोजक्याच प्रतिक्रिया देऊन गेली.अन बौध्दांच्या अस्मितेशी आजमितीस असणारा प्रश्न आहे तो पुन्हा जसाचा तसाच उपेक्षीत राहत गेला. दलित,दलित म्हणुन दलित विभागला गेला त्यामुळे दलित म्हणुन कोणीही अत्याचार करावेत अन दलितांनी रस्त्यावर उतरावे येथपर्यंतच आपली मजल राहिली परंतु प्रतिबंधात्मक उपायोजना ना साहित्यातुन आली ना,राज्यकर्त्यांतून आली. अॅट्रोसिटी अॅक्ट कायदा आला परंतु तो ही कागदावरच राहिला.अन फास्ट ट्रॅक कोर्टातुन दलितांची दिशाभुल करून पुराव्या अभावि दलितांवर अत्याचार करणारे अत्याचारी सुटु लागले.ख-या अर्थाने या 85 टक्के दलितांच्या मतावर सरकार स्थापले जाते अन त्यातुन दलित हा वंचितच हेतुपुरस्पर राखण्यात प्रस्थापीतांनी यश मिळविले हे सोडवण्यासाठी अजुनही आपले डोळे उघडतच नाहीत हिच मोठी शोकांतीका या संस्थेच्या स्थापने पर्यंत चालुच होती.बौध्द साहित्य म्हणजे नेमके काय हे दलित साहित्याहुन वेगळे आहे का ? असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा काय मांडणी करावी हा विचार येऊन न्याय,स्वातंत्र्य,मैत्रबंधुभाव जसेच्या तसे ठेवुन समता टिकवावी का ? स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे असेही प्रश्न पुन्हा उभे राहिल्याने.आजचा हा जातीपातीत विभागलेला समाज तथागतांच्या काळात सागरासारखा एकसंघ होता.तेव्हा दलित न म्हणता बौध्द म्हणुन,बहुजन समाजमनाचा आरसा म्हणुन प्रतिबिंबीत होणारी संपूर्ण भारतातुन पहिलीच एक बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. या बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे रजिस्ट्रेशन क्रमांक महा./1510/18/ठाणे व ट्रस्टचा रजि.क्रमांक एफ – 39323 असा असून नीती आयोगाकडील युनिकआयडी क्रमांक MH/2018/0214195 असा आहे यातच आपल्या सर्व भारतीय बौध्द बांधवांची बौध्द म्हणुन अस्मिता आहे. बौध्द साहित्याकडे डोकावले असता काळाच्या ओघात अन पृथ्वीच्या पोटात जे काही उत्खनानाने मिळते ते सर्वकाही बौध्द संस्कृतीचेच पुरावे सापडत असल्याने बौध्द संस्कृती अन साहित्य या विशयी जिज्ञासा जागृत होते. या विशयीची माहिती हि बौध्दग्रंथ त्रिपीटकात असल्याने बौध्द साहित्याचा खजिना हा त्रिपीटक असल्याचे निष्पन्न होते.तसेच युध्द नको बुध्द हवा असल्याने सर्व जगाचे शांतीदुत तथागत भगवान गौतम बुध्द असल्याने या शांतीदुताचा वैभवशाली भारत अन बौध्द साहित्य कसे असेल याची उत्सुकता संपूर्ण विष्वाला आहे.तेव्हा बुध्दभुमी म्हणुन या भारतात डोकावले असता बुध्दांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुध्दगया हि भुमीच बौध्दांच्या ताब्यात नाही येथील बौध्दांच्या पवित्र स्थानाला विहार म्हणतात ते महाबोधी विहार असुनही त्याला महाबोधी टेम्पल असे संबोधले जाते,शिवाय हे महाबोधी टेम्पल भारत स्वतंत्र होवुन 72 वर्शे झाले परंतु अदयाप महाबोधी टेम्पल अॅक्ट 1945 नुसार अजुनही ते स्वतंत्रपणे बौध्दांच्या ताब्यात नाही.अजुनही टेम्पल अॅक्ट 1945 रद्य व्हावा असे येथल्या राज्यकर्त्यांना वाटत नाही.या महाबोधी विहारातच बॉम्ब स्फोट घडवले जातात तसेच 20 व्या शतकातही भारतात कोठेना कोठे दर पाच मिनिटाला बौध्दांवर अन्याय अत्याचार होतात.असे या भारतभुमीचे खरे वास्तव स्वरूप आहे.तर भारतीय साहित्यक्षेत्रात साहित्यीक म्हणुन डोकावले असता संपूर्ण भारतात बौद्धसंस्कृती नुसार आणि बदलत्या काळात मराठी भाषेतून पाली भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपलीही एक दर्जेदार साहित्य संस्था असावी आणि दलित म्हणुन उपेक्षीत न राहता आपल्या स्वतःच्या हाताच्या ओंजळीने पाणी पिता यावे तसेच आपलीही प्रगती व्हावी या उद्येशाने या संस्थेची स्थापना करण्याचे ज्येष्ठ साहित्यिक,कवी, लेखक,समिक्षक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी ठरविले.त्यावेळी असलेल्या दलित साहित्यातीलच आपली मातब्बर साहित्यीक मंडळींजवळ हा विषय त्यांनी बोलुन दाखविताच त्यांनाही आवडला.सुरूवातील आम्ही कविसंमेलने घेत राहिलो आणि त्यातुनच भारतीय बौध्द साहित्य परिषद संस्था उभी राहिली याचे सारे श्रेय प्रा.शुक्राचार्य गायकवाड सरांना जाते.या बौध्द साहित्य परिषदेचे दिनांक 22/10/2017 रोजी डोंबिवली येथील सर्व्हेश हॉल मध्ये दै.वृत्तरत्न सम्राटचे संपादक आद. बबनराव कांबळे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले त्याप्रसंगी साहित्यिकांना उद्येषुन बोलताना आद.कांबळे साहेब म्हणाले स्वाभिमान जागवा,नविन पिढी तुमची वाट पाहत आहे तेव्हा साहित्यिकांनी वाघासारखे,सम्राटासारखे रहा.सम्राटच्या सम्राटने स्वाभिमान जागवल्याने भारतीय बौध्द साहित्य परिषदेचा कळवा येथील बौध्द विकास मंडळाचे नालंदा बुध्द विहार ते सणसवाडी पुणे येथील बुध्दीस्ट मुव्हमेंट ट्रस्टचे नालंदा बुध्द विहार असा साहित्यमयी प्रवास होवुन पहिले एक राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलन पुणे येथे सणसवाडीला यशस्वीपणे पार पडले. रजिस्ट्रेषनची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली पहिलीच हि बौध्द साहित्य प्रसार संस्था असल्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्व बौध्द साहित्यीक बांधवांना आहे यातच तो मला लाभलेला आहे.या संस्थेच्या ध्येय धोरणांची प्रभाविपणे अंमलबजावणी करून साहित्यक्षेत्रातील बौध्द साहित्य आणि तथागतांचा धम्म जगाच्या पाठीवर सर्वत्र पोहोचवुन त्याचा प्रचार अन प्रसार करण्याचे काम आपल्या सर्व साहित्य बांधवांवर येऊन ठेपले आहे. तेव्हा सर्व बौध्द साहित्यीक बांधवांनी आपल्या मुळअंगी असलेल्या शुध्द स्वरूपातल्या साहित्यीक सुप्तगुणांना उजाळा देऊन,विधायक कामे करून,आपलीही शुध्दबौध्द साहित्यकृती या संस्थेच्या माध्यमातुन सर्वांना मिळावी त्याचा सर्वत्र जगभर प्रचार अन प्रसार व्हावा त्याचबरोबर तुमचाही संस्थेबरोबरच नावलौकीक व्हावा याच शुध्द हेतुने बौध्द साहित्य प्रसार संस्था हिची स्थापना करण्यात आली असुन हा एक आपल्याला मिळालेला प्लॅटफॉर्म आहे याचे आपण सोने करून !!!अत्त दिप भव !!! प्रमाणे स्वतः उजाळुन दुस-यांसही उजाळुन काढाल हिच अपेक्षा व्यक्त करतो.