विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२१
नियम
थोडक्यात: नवीन लेख हा आशिया खंडातील देशांतील विषयांवर (भारत सोडून), चांगल्या दर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट आकाराचा, २०२१च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा; आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.
- हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०२१ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३० , २०२१ ०५:०० (UTC) स्वतः बनवलेला असला पाहिजे.
- सदर लेख किमान ३००० बाईट आकाराचा आणि किमान ३०० शब्दांचा असावा. (महितीचौकट, साचे सोडून)
- सदर लेखाला उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.
- लेख पुर्णतः मशीन रूपांतरित नसावा व भाषा शुद्ध असली पाहिजे.
- लेखात प्रमुख समस्या नसणे आवश्यक आहे (उदा. कॉपीराईट उल्लंघन, उल्लेखनियता स्पष्ट असावी)
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा असला पाहिजे.
- सदर लेख मराठी भाषेत लिहिलेला असावा पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांतील विषयांवर असावा.
- स्पर्धा आयोजित करणाऱ्या लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
- स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे मराठी भाषेतील परीक्षक निर्धारित करतील.
- जेव्हा आपले वरील निकष पूर्ण करणारे किमान ४ लेख स्वीकारले जातील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकाकडून WAM पोस्टकार्ड मिळेल.
- तुम्ही 'विकिपीडिया आशियाई दूत' घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल.
या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा.
संदर्भ दुवे
आयोजक
साइन अप
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करा (साइन अप करा) आणि तुमचे योगदान द्या.
लेख सादर करा
एकदा तुम्ही तुमचे लेख तयार केल्यानंतर, कृपया खाली क्लिक करून फाउंटन टूलद्वारे लेख सबमिट करा.