विकिपीडिया:विकिपीडियावरील शुन्यावा नियम

शुन्यावा नियम म्हणजे असा नियम की, जो मुलभूत नियम आहे पण जो फारसा बोलला जात नाही. जसे की, उष्मागतीकीच्या नियमामधे सगळ्या प्रकारची उष्मा ही सारखीच असते हे जरी उल्लेखलेले नसले तरीही ते अध्याहृत आहे.[१] तसेच कोणाही एका व्यक्तिपेक्षा माणुसकी हे तत्व म्हणून महत्वाचे आहे.

  • तसेच, विकिपीडियावरही चांगली संपादने करणारे चांगले सदस्य हे आपला अनमोल ठेवा आहेत.
  • किंवा वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, चांगले लेख लिहायला चांगले सदस्यच हवेत.
  • काही लोक म्हणतील विश्वसनीय स्त्रोत सगळ्यात महत्वाचे आहेत, पण वास्तविक पहाता चांगले सदस्यच विश्वसनीय स्त्रोत शोधून आणतात.
  • काहींच्या मते नि:पक्ष असणे सगळ्यात महत्वाचे आहे, पण चांगले सदस्यच जास्तीचे संदर्भ शोधून आणतात, चर्चापानावर चर्चा करून लेखांना नि:पक्षपाती बनवतात आणि उत्तम लेख तयार करतात.
  • चांगले सदस्य प्रताधिकार असलेले साहित्य वाचतात आणि त्यातून त्याच संकल्पना आपल्या शब्दांत विश्वकोशीय शैलीत संदर्भासह मांडतात जेणेकरून प्रताधिकार भंग न करता चांगले साहित्य निर्माण होते.
  • चांगले सदस्य आपल्याकडचे स्वत: काढलेले फोटो प्रताधिकार मुक्त करून विकिवर आणतात, तसेच इतरांनाही तसेच करायला प्रोत्साहित करतात.
  • चांगले सदस्य शुद्धलेखनाचे नियम पाळून लिहितात, स्पष्ट आणि सुगम्य भाषेत लिहितात, शैली मार्गदर्शकाचे पालन करतात.
  • चांगले सदस्य एकत्रीतपणे काम करतात, आपण सगळेच स्वयंसेवक आहोत आणि म्हणूनच एकट्याला सगळेच माहित असणे शक्य नसते त्यामुळे एका उत्तम ज्ञानकोशाची निर्मिती ही समुदायाने एकत्र येऊन करण्याचीच बाब आहे.
  • अनेकांचे म्हणणे आहे की, विकिपीडिया हा एक दणकेबाज ज्ञानकोश आहे, आणि चांगले सदस्य हा ज्ञानकोश एककल्ली हो न देण्यासाठी सतत काम करत रहातात.

याचा अर्थ असा आहे का? की चांगली संपादने करणारे सदस्य कुठल्याही किंमतीवर टिकवलेच पाहिजेत? नक्कीच नाही, जर चांगल्या सदस्यांकडून इतर चांगल्या सदस्यांना वारंवार त्रास दिला जात असेल तर, ह्या त्रास देणाऱ्या पूर्वाश्रमीच्या चांगल्या सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे गरजेचे बनते.

म्हणजेच, कारवाई ही झालीच पाहिजे, पण कमीत कमी आणि परिणामकारक असली पाहिजे, जेणेकरून इतर विकिपीडिया सदस्यांना कमीत कमी त्रास होईल, शेवटी चांगले सदस्य आपल्याला महत्वाचे आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ Maxwell, J. C. (1871). Theory of Heat. London: Longmans, Green, and Co. p. 57.