विकिपीडिया:मासिक सदर/जून २००७

चित्र:Dikshabhumi.JPG

नागपूर हे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर आहे. नागपूर शहर हे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर तर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर जिल्हा व नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय येथे आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात भरते. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे आहे. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरास 'संत्रेनगरी' असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे. दीक्षाभूमी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे.

नुकताच शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलो मीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मीटर आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. नागपूर मध्य भारतातील प्रमुख शैक्षणिक व आर्थिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान (कार्गो हब) व प्रवासी केंद्राची निर्मिती होत आहे.

पुढे वाचा...